सांगरूळच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:21 IST2021-01-17T04:21:51+5:302021-01-17T04:21:51+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगरूळ : सांगरूळच्या जनतेने ज्या विश्वासाने आपल्या हाती एकमुखी सत्ता दिली त्यांची कधीही निराशा होऊ देणार ...

सांगरूळच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगरूळ : सांगरूळच्या जनतेने ज्या विश्वासाने आपल्या हाती एकमुखी सत्ता दिली त्यांची कधीही निराशा होऊ देणार नाही. सर्वांना विश्वासात घेऊन सर्वसमावेशक कामकाज करीत सांगरुळच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन लोकनियुक्त सरपंच सदाशिव खाडे यांनी केले.
सांगरूळ येथील पंचशीलनगर येथे ग्रामपंचायतीच्या निधीतून समाज मंदिरच्या पायापूजन शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाजिनाथ खाडे होते.
यावेळी खाडे म्हणाले, लोकप्रतिनिधी म्हणून सर्वसामान्य लोकांपर्यत मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी आपण प्रयत्नशील आहे. गावातील विकासासाठी गट-तट पक्ष न पाहता मिळेल तिथून निधी घेऊन गावचा विकास साधला आहे. दलितवस्तीतील रस्त्यांची कामे जवळपास पूर्ण होत आली असून यावेळी चौदाव्या व पंधराव्या वित्त आयोगातून दलित वस्तीसाठी समाज मंदिर बांधून देण्याचे काम ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सुरू करीत असल्याचे सांगितले.
शशिकांत म्हेत्तर म्हणाले, ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सांगरूळमध्ये विकासकामांचा धडाका सुरू आहे. ग्रामपंचायतीच्या सर्वसमावेशक कारभारामुळे गेल्या अनेक वर्षांपासून हरिजन वस्तीतील समाज मंदिराची मागणी होती. ती पूर्ण होत असल्याने सर्वच स्तरातून समाधान व्यक्त होत आहे.
यावेळी कुंभीचे उपाध्यक्ष निवास वातकर, यशवंत बँकेचे माजी व्हाईस चेअरमन दिलीप खाडे, उपसरपंच सुशांत नाळे, कृष्णात खाडे , सरदार खाडे, तलवार बहादूर शिंदे, विठ्ठल कांबळे, मधुकर कांबळे, महादेव कांबळे, दुर्वास कांबळे, जयप्रकाश सांगरुळकर, अशोक घाडगे, विष्णू जाधव, आनंदा कांबळे, जयकुमार कांबळे, सर्जेराव सांगरूळकर, जालिंदर कांबळे, ज्योतीराम कांबळे,ग्रामविकास अधिकारी पांडुरंग बिडकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
फोटो ओळी - सांगरूळ (या.करवीर) येथे दलित वस्तीमध्ये समाज मंदिर इमारतीच्या भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी सरपंच सदाशिव खाडे, सुशांत नाळे, निवास वातकर आदी उपस्थित होते.