उजळाईवाडीतील विकासकामे करण्यास कटिबद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:30 IST2021-09-10T04:30:07+5:302021-09-10T04:30:07+5:30

उचगाव : उजळाईवाडी (ता. करवीर) येथील दादू चौगुले, हनुमाननगर, तुळजा भवानीनगर, महालक्ष्मी नगर, कोर्ट कॉलनी परिसरातील अंतर्गत रस्ते, गटर्स, ...

Committed to development work in Ujlaiwadi | उजळाईवाडीतील विकासकामे करण्यास कटिबद्ध

उजळाईवाडीतील विकासकामे करण्यास कटिबद्ध

उचगाव : उजळाईवाडी (ता. करवीर) येथील दादू चौगुले, हनुमाननगर, तुळजा भवानीनगर, महालक्ष्मी नगर, कोर्ट कॉलनी परिसरातील अंतर्गत रस्ते, गटर्स, सांस्कृतिक सभागृह व संरक्षक भिंतीची कामे प्राधान्याने करण्यास कटिबद्ध आहे, अशी ग्वाही आमदार ऋतुराज पाटील यांनी दिली. येथील अभिजित पाटील, हर्षवर्धन धोत्रे, नंदादीप नेत्रालय हॉस्पिटल व युवा ग्रामीण विकास संस्थेच्यावतीने आयोजित आरोग्य शिबिराच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. या आरोग्य तपासणी शिबिरात ११२ जणांची नेत्र व आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी ‘मॅक’चे माजी अध्यक्ष हरिश्चंद्र धोत्रे, मराठा महासंघाच्या महिला अध्यक्षा शैलजा भोसले, मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष शशिकांत पाटील, सोनाली मजगे, सचिन पाटील, नंदकुमार मजगे उपस्थित होते.

फोटो : उजळाईवाडी येथे आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिरप्रसंगी आमदार ऋतुराज पाटील, अभिजित पाटील, हर्षवर्धन धोत्रे, अभिजित नलगे, सचिन पाटील, नंदकुमार मजगे उपस्थित होते.

Web Title: Committed to development work in Ujlaiwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.