दत्तवाडच्या विकासासाठी कटिबद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:18 IST2021-05-31T04:18:05+5:302021-05-31T04:18:05+5:30

दत्तवाड : दत्तवाडमधील ग्रामीण रुग्णालय परिसरातील गावांना आधारवड ठरत असून, दत्तवाडच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र ...

Committed to the development of Dattawad | दत्तवाडच्या विकासासाठी कटिबद्ध

दत्तवाडच्या विकासासाठी कटिबद्ध

दत्तवाड : दत्तवाडमधील ग्रामीण रुग्णालय परिसरातील गावांना आधारवड ठरत असून, दत्तवाडच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिली.

येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा व दिव्यांगांसाठी तीनचाकी सायकल अर्पण कार्यक्रम राज्यमंत्री डॉ. यड्रावकर यांच्या हस्ते झाला. या वेळी दिव्यांग आप्पासो कुंभार यांना तीनचाकी सायकल प्रदान करण्यात आली. सरपंच चंद्रकांत कांबळे यांनी विविध विकासकामांची माहिती दिली. आदिनाथ हेमगिरे, अशोक टाकवडेकर यांनी विविध प्रश्न मांडले. याप्रसंगी डी. एन. सिदनाळे, नूर काले, आण्णाप्पा सिदनाळे, बाळासो कोकणे, सचिन हेरवाडे, प्रशांत कांबळे, उपसरपंच नाना नेजे, बाबुराव पवार यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. फोटो - ३००५२०२१-जेएवाय-०२

फोटो ओळ - दत्तवाड (ता. शिरोळ) येथील ग्रामीण रुग्णालयास रुग्णवाहिका प्रदान करण्यात आली. यावेळी राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Web Title: Committed to the development of Dattawad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.