उमेदवारांवर आयोगाची नजर

By Admin | Updated: October 19, 2015 00:50 IST2015-10-18T00:27:08+5:302015-10-19T00:50:32+5:30

महापालिका निवडणूक : आजपासून अंमलबजावणी; कोम्बिंग आॅपरेशन

The Commission's eyes on the candidates | उमेदवारांवर आयोगाची नजर

उमेदवारांवर आयोगाची नजर

कोल्हापूर : महापालिका निवडणुकीतील उमेदवारी अर्ज भरणे, माघार घेणे, चिन्हांचे वाटप हा महत्त्वाचा टप्पा शनिवारी पूर्ण झाल्यानंतर आता आज, रविवारपासून आचारसंहितेच्या काटेकोर अंमलबजावणीस सुरुवात होणार असून, कोम्बिंग आॅपरेशन, भरारी पथकांद्वारे डोळ्यांत तेल घालून टेहळणी केली जाईल, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा आयुक्त पी. शिवशंकर व पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.
कोल्हापूर शहरात निवडणूक सुरू असल्याने आचारसंहिता पालनकरण्याच्या मोहिमेचा भाग म्हणून रविवारपासून पोलीस बंदोबस्तात भरारी पथके उमेदवार व त्यांच्या समर्थकांच्या हालचालीवर लक्ष ठेवणार आहेत. सात क्षेत्रीय निवडणूक कार्यालयांची सात पथके, मुख्य निवडणूक कार्यालयातील दोन भरारी पथके संपूर्ण शहरभर टेहळणी करणार आहेत. तसेच शहरात प्रवेश करणाऱ्या मुख्य अशा सहा रस्त्यांवर नाकाबंदी केली जाणार आहे. ही नाकाबंदी चोवीस तास राहील. कोम्बिंग आॅपरेशन रात्रीच्या वेळी केले जाणार असून, शहर तसेच परिसरातील लॉजेस, हॉटेलवर तपासण्या केल्या जाणार आहेत. आतापर्यंत आचारसंहिता भंगाच्या १९ तक्रारी दाखल झाल्या होत्या, त्याची चौकशी करून चार गुन्हे दाखल झाले आहेत.
२० ठिकाणी संवेदनशील केंद्रे
निवडणुकीच्या निमित्ताने पोलिसांनी शहरातील २० ठिकाणे संवेदनशील म्हणून निश्चित केली आहेत.या ठिकाणी किती केंद्रे येतात हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी ठिकाणांवरून तेथील मतदान केंद्र संवेदशील असतील त्या ठिकाणी जादा पोलीस बंदोबस्त राहील, असे अधीक्षक शर्मा यांनी सांगितले. शहर परिसरात परवानाधारक ७१८ शस्त्रधारकांपैकी १०० शस्त्रधारकांनी आपली हत्यारे पोलीस ठाण्यात जमा केली असून, जमा करण्याची प्रक्रिया सुरूआहे, असेही त्यांनी सांगितले.
मतदानादिवशी कडेकोट बंदोबस्त
८१ प्रभागांत ३७८ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. १ नोव्हेंबरला प्रत्यक्ष मतदानादिवशी एक पोलीस अधीक्षक, दोन अतिरिक्त पोलीस अधीक्षक, पाच उपाधीक्षक, १२ पोलीस निरीक्षक, २७ उपनिरीक्षक, १३६० पोलीस, १००० होमगार्डस् तसेच दोन सीआरपीएफ कंपनी असा कडेकोट पोलीस बंदोबस्त राहणार असल्याची माहिती
डॉ. शर्मा यांनी दिली.

Web Title: The Commission's eyes on the candidates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.