महापालिकेत ‘लेट कमर्स’ना आयुक्तांचा झटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2020 03:23 PM2020-02-08T15:23:07+5:302020-02-08T15:28:23+5:30

‘कधीही यावे आणि कधीही जावे’अशी सवय झालेल्या महानगरपालिका कर्मचाऱ्यांना शुक्रवारी आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी मोठा झटका दिला. आयुक्तांनी सकाळी सहा वाजता अचानक महापालिका इमारत तसेच शिवाजी मार्केट विभागीय कार्यालयातील सर्व विभागांना भेट देऊन तेथे वेळेवर न आलेल्या सुमारे २४५ कर्मचारी व अधिकाºयांना तात्काळ कारवाई का करू नये म्हणून नोटीस बजावली.

Commissioner's blow to 'late commerce' in the municipality | महापालिकेत ‘लेट कमर्स’ना आयुक्तांचा झटका

महापालिकेत ‘लेट कमर्स’ना आयुक्तांचा झटका

Next
ठळक मुद्देमहापालिकेत ‘लेट कमर्स’ना आयुक्तांचा झटकाउशिरा आल्याबद्दल २४५ कर्मचाऱ्यांना नोटिसा

कोल्हापूर : ‘कधीही यावे आणि कधीही जावे’अशी सवय झालेल्या महानगरपालिका कर्मचाऱ्यांना शुक्रवारी आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी मोठा झटका दिला. आयुक्तांनी सकाळी सहा वाजता अचानक महापालिका इमारत तसेच शिवाजी मार्केट विभागीय कार्यालयातील सर्व विभागांना भेट देऊन तेथे वेळेवर न आलेल्या सुमारे २४५ कर्मचारी व अधिकाºयांना तात्काळ कारवाई का करू नये म्हणून नोटीस बजावली.

ज्याप्रमाणे कर्मचारी गैरहजर असल्याचे पहायला मिळाले तसे सर्व विभागातील सर्वच वरिष्ठ अधिकारीही गैरहजर असल्याचे आयुक्तांच्या निदर्शनास आले. सुमारे अर्धा तास आयुक्त कलशेट्टी यांनी पाहणी केली. एक एक विभाग करत त्यांनी मुख्य इमारतीतील सर्व विभाग पिंजून काढले. त्यानंतर त्यांनी शिवाजी मार्केट विभागीय कार्यालयाकडे मोर्चा वळविला. त्यांच्या सोबत कामगार अधिकारी सुधाकर चल्लावाड होते.

कलशेट्टी यांनी शुक्रवारी सकाळी दहा वाजता महापालिकेतील मुख्य इमारत व छत्रपती शिवाजी मार्केट येथील कार्यालयाची अचानक पहाणी सुरु केली तेव्हा सत्तर टक्के कर्मचारी कार्यालयात यायचे होते, तर केवळ तीस टक्के कर्मचारी कार्यालयात येऊन स्थानापन्न झाले होते. त्यांनीही कामाला सुरुवात केली नव्हती. त्यामुळे आयुक्त संतप्त झाले. त्यांनी तात्काळ बायोमेट्रीक मशिनवरील हजेरीच्या नोंदी प्राप्त करून घेण्याच्या सूचना कामगार अधिकारी चल्लावाड यांना दिल्या.

बायोमेट्रीक हजेरी तपासली असता २४५ कर्मचारी हे सकाळी १० वाजून १० मिनिटानंतर आल्याचे दिसून आले. या सर्वांना तातडीने आयुक्तांनी कारवाई का करू नये म्हणून कारणे दाखवा नोटीस लागू केली. या कर्मचाºयांकडून खुलासा मागविण्यात आला आहे.

शुक्रवारी जे कर्मचारी वेळेत पोहोचले नाहीत त्या सर्वांची दि. ४ , ५ , ६ फेब्रुवारी रोजीची बायोमेट्रीक हजेरी तसापावी तसेच कोण किती वाजता आले याची माहिती संकलित करा, असे आयुक्तांनी सांगितले आहे. या तीन दिवसांत जे जे कर्मचारी सकाळी १० वाजून १० मिनिटांनी आले असतील त्यांची एक दिवसाची किरकोळ रजा मांडण्याचे आदेश आयुक्तांनी आस्थापना विभागास दिले आहेत.

प्रशासनावर वचक राहिला नाही

कोणीही आयुक्त आले की त्यांचा महापालिकेच्या कोणत्याही विभागाशी थेट संबंध येत नाही. आला तरी प्रत्यक्ष कधी भेट देण्याचा कोणी आयुक्त प्रयत्न करत नव्हते. फार फार तर नगररचना विभागात एखादी भेट देऊन तेथील कामकाजाचा आढावा घेतला जात होता. त्यामुळे कर्मचारी आळशी बनले होते. प्रशासनावर कोणत्याच अधिकाऱ्याचा वचक नसल्यामुळे ‘आओ जावो घर तुम्हारा’ अशी परिस्थिती निर्माण झाली होती.

जेवून, झोपून कर्मचारी येतात

महापालिकेतील कर्मचाऱ्यांवर कोणाचा वचक राहिला नसल्यामुळे अनेक कर्मचारी दुपारी दीड वाजता घरी जाऊन जेवून तसेच तासभर झोपून दुपारी कार्यालयात यायचे. त्यांना जाब विचारणारे कोणीच नसल्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून ही सवयच बनून गेली होती.

काही कर्मचारी सकाळी वेळेवर येऊन बायोमेट्रीक हजेरी मांडून जे बाहेर पडायचे ते सायंकाळीच पुन्हा हजेरी मांडायला यायचे. तासाभरात कार्यालयातून बाहेर पडत असत. कोण काय करतो, कोठे जातो याचा कसलाही ताळतंत्र राहिलेला नाही. कसलीही पद्धत येथे राहिलेली नाही.

तीन दिवसाला एक रजा खर्ची टाकणार

कार्यालयात उशिरा येणे आयुक्तांनी गांभीर्याने घेतले असून, जानेवारी महिन्यातील सर्वच कर्मचाऱ्यांची बायोमेट्रीक हजेरी तपासण्यास कामगार अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. तीन दिवसाला एक याप्रमाणे जानेवारी महिन्यात उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांची रजा खर्ची टाकण्यात येईल.

 

Web Title: Commissioner's blow to 'late commerce' in the municipality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.