शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान-सौदी अरेबियात डील, भारताची पहिली प्रतिक्रिया; "आम्ही देशहिताचं रक्षण करण्यासाठी..."
2
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
3
महामार्गावर अचानक भूस्खलन, पळाले म्हणून थोडक्यात वाचले भाजप खासदार; व्हिडीओ केला शेअर
4
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
5
पहिल्याच प्रयत्नात नीरज पोहोचला अंतिम फेरीत; जागतिक अजिंक्यपद : सचिन यादवही ठरला पात्र
6
तासाभराचं नाट्य, बहिष्काराची धमकी, ६ ईमेल आणि..., पाकिस्तान असा आला वठणीवर, त्या बैठकीत काय घडलं?
7
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
8
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
9
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी
10
Share Market: US Fed च्या निर्णयानंतर देशांतर्गत शेअर बाजारात मोठी तेजी, सेन्सेक्स ३०० अंकांनी वधारला; 'या' शेअर्समध्ये तेजी
11
पुतण्या तलावात बुडाला, वाचवण्यासाठी चुलतीसह भावाची पाण्यात उडी, शेवट भयंकर!
12
१२ वर्षांच्या संसाराची काडीमोड! लोकप्रिय टीव्ही अभिनेत्याचा घटस्फोट, बायकोशी असलेलं नातं मोडलं
13
Crime: ट्यूशनसाठी गेली, नंतर तुकड्या-तुकड्यांमध्ये मिळाला मुलीचा मृतदेह; आईवडिलांचा आक्रोश, शिक्षकानेच...
14
पितृपक्ष २०२५: स्वतःचे आणि कुटुंबाचे पिंडदान केल्यावरच नागा साधू बनता येते; सविस्तर वाचा
15
आईकडे संपत्ती नसली, तरीही मुलांच्या संगोपनाचा तिला हक्क; जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचा निर्णय
16
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
17
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
18
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
19
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
20
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक

आयुक्तसाहेब, ‘केशवराव’चं पुढं काय झालं?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2019 01:01 IST

उद्या, शुक्रवारपासून सुरू होणाºया ‘राज्य नाट्य’च्या स्पर्धकांना आणि प्रेक्षकांना या गैरसोर्इंचा मोठा त्रास सहन करावा लागणार आहे.राज्य शासनाच्या निधीतून २०१४ साली केशवराव भोसले नाट्यगृहाचे नूतनीकरण झाले; पण आतून आणि बाहेरूनच केवळ देखणी, चकाचक इमारत सोडली तर नाट्यगृहातील प्राथमिक सुविधांच्या नावाने सगळा आनंदीआनंद आहे.

ठळक मुद्देउद्यापासून सुरू होणाऱ्या राज्य नाट्य स्पर्धेच्या स्पर्धक, प्रेक्षकांना होणार त्रास नाट्यगृहात गैरसोर्इंची जंत्री : बैठकीवरच थांबला विषय

इंदुमती गणेश ।

कोल्हापूर : कोल्हापुरातील कलाविश्वाचे केंद्र असलेल्या केशवराव भोसले नाट्यगृहातील गैरसोर्इंची जंत्री वाढतच चालली आहे. या गैरसोर्इंबाबत मे महिन्यात आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी कलाकारांसोबत घेतलेल्या बैठकीनंतर त्यावर उपाययोजना करण्याच्या दृष्टीने एकही पाऊल उचलले गेले नाही. उद्या, शुक्रवारपासून सुरू होणाºया ‘राज्य नाट्य’च्या स्पर्धकांना आणि प्रेक्षकांना या गैरसोर्इंचा मोठा त्रास सहन करावा लागणार आहे, राज्य शासनाच्या निधीतून २०१४ साली केशवराव भोसले नाट्यगृहाचे नूतनीकरण झाले; पण आतून आणि बाहेरूनच केवळ देखणी, चकाचक इमारत सोडली तर नाट्यगृहातील प्राथमिक सुविधांच्या नावाने सगळा आनंदीआनंद आहे.

मूळ वास्तूचे बदललेले रुपडे सोडले तर इथे मेकअप रूम, नाटकांच्या सादरीकरणासाठी लागणारी लेव्हल, स्टेज, वेगवेगळ्या प्रकारचे लाईट्स, डिमर, स्पॉट, पडदे, नेपथ्यासाठी लागणाºया मूलभूत वस्तू या सगळ्या सुविधांची अक्षरश: वानवा आहे.नाट्यगृहातील प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी रंगकर्मींनी आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्याकडे प्रत्यक्ष पाहणी करण्याची विनंती केली होती. आयुक्तांनी ती तातडीने मान्य करीत मे महिन्यात ‘केशवराव’मधील गैरसोर्इंची पाहणी केली, रंगकर्मींच्या अडचणी

समजून घेतल्या आणि लवकरात लवकर त्यांवर उपाययोजना करण्याचे आश्वासनही दिले; पण त्या आश्वासनाची गाडी तिथेच पंक्चर झाली. त्यानंतर सुविधांच्या दृष्टीने एकही पाऊल महापालिकेच्या व्यवस्थापनाकडून उचलले गेलेले नाही. उद्यापासून राज्य नाट्य स्पर्धा सुरू होत आहेत. त्यासाठी येणा-या संघांना सादरीकरणासाठीची वास्तू सोडली तर कोणतीही सुविधा नाही. रंगमंचाचे प्राथमिक सेटदेखील मिलिंद अष्टेकर यांच्याकडून पुरविले जातात.

चालविता येत नसेल तर शासनाला परत कराराजर्षी शाहू महाराजांनी उभारलेले हे नाट्यगृह पूर्वी राज्य शासनाच्या अखत्यारित होते. महापालिका अस्तित्वात आल्यानंतर महापालिकेने स्वत:हून त्याची जबाबदारी स्वीकारली. तेव्हापासून नाट्यगृहाचे दिवस बदलले, खुद्द राजर्षी शाहू महाराज आणि केशवरावांची छायाचित्रेही येथे बेदखल झाली. सुविधांच्या नावाने तर चांगभलंच! त्यामुळे महापालिकेला नाट्यगृह चालवणं जमणार नसेल तर त्यांनी ही वास्तू शासनाला परत करावी, अशी मागणी ज्येष्ठ नाट्य व्यावसायिकांनी केली आहे.नाट्य परिषद पुरविणार पाणीपिण्याचे पाणी ही महत्त्वाची गोष्टदेखील नाट्यगृहाच्या आवारात नाही. आता राज्य नाट्य स्पर्धा सुरू होत आहे. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी असते. कलाकारांना सादरीकरणादरम्यान पाण्याची नितांत आवश्यकता असते, याचीही जाणीव महापालिका व संबंधित व्यवस्थापनाला नाही. अखेर स्पर्धा कालावधीत अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या वतीने कलाकार व प्रेक्षकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात येणार आहे.

 

  • या आहेत गैरसोयी
  • केशवरावांचा पुतळा नाही, तर छायाचित्र छतावर
  • पिण्याचे पाणी नाही, वॉटर कुलर्स बंद अवस्थेत
  • लेव्हल्स, बॉक्स सेट, पडदे, स्पॉटलाईट, पार लाईट्स, डीमर
  • हे प्राथमिक साहित्य नाही.
  • साउंड आॅपरेटर नाही
  • कलाकार व प्रेक्षकांसाठी
  • चहा, नाष्टा, सादरीकरणानंतर जेवण्यासाठी
  • कॅँटीन नाही.
  • अस्वच्छ व दुरवस्था झालेले स्वच्छतागृह
  • तिकीटविक्रीसाठी
  • खोली नाही
  • प्रवेशद्वारावर नाट्यगृहाच्या नावाची पाटी नाही, चांगली प्रकाश-योजना नाही.

 

नाट्यगृहाच्या गैरसोर्इंबाबत महापालिकेची दारे ठोठावून आम्ही आता दमलोय. आयुक्तांसोबत झालेल्या बैठकीनंतर परिस्थिती सुधारेल अशी अपेक्षा होती; पण पुढे काही झाले नाही. अशा परिस्थितीत राज्य नाट्य स्पर्धा रंगणार कशी आणि नाट्यचळवळ चालवायची कशी, हे महापालिकेने सांगावे.- आनंद कुलकर्णी, अध्यक्ष, अ. भा. मराठी नाट्यपरिषद, कोल्हापूर शााखासादरीकरणासाठीची वास्तू सोडली तर नाट्यगृहात कोणतीही सुविधा नाही. सांस्कृतिक संचालनालयाकडून ‘राज्य नाट्य’मधील संघांना सहा हजार रुपये दिले जातात. बाकी सगळी व्यवस्था त्यांनीच करायची. नाट्यगृहात आल्यानंतर कोणत्याही कारणासाठी कलावंत किंवा प्रेक्षकांना बाहेर जावे लागू नये अशा सोईसुविधा असल्या पाहिजेत.- मिलिंद अष्टेकर, उपाध्यक्ष, अ. भा. मराठी नाट्य परिषद

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरNatakनाटक