वाणिज्य बातमी : सचिन सुपर स्पेशालिटीमध्ये रविवारी ‘थेट भेट हृदयाशी’ स्नेहमेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:24 IST2021-02-13T04:24:35+5:302021-02-13T04:24:35+5:30

या कार्यक्रमामध्ये केवळ रुग्ण आणि डॉक्टर या नात्याच्या पलीकडे जाऊन सर्वांच्या निरोगी आनंदी जीवनासाठी संकल्प आणि प्रार्थना केली जाते. ...

Commercial News: Sachin Super Specialty 'Live Meet Heart' on Sunday | वाणिज्य बातमी : सचिन सुपर स्पेशालिटीमध्ये रविवारी ‘थेट भेट हृदयाशी’ स्नेहमेळावा

वाणिज्य बातमी : सचिन सुपर स्पेशालिटीमध्ये रविवारी ‘थेट भेट हृदयाशी’ स्नेहमेळावा

या कार्यक्रमामध्ये केवळ रुग्ण आणि डॉक्टर या नात्याच्या पलीकडे जाऊन सर्वांच्या निरोगी आनंदी जीवनासाठी संकल्प आणि प्रार्थना केली जाते. विशेष म्हणजे यावेळी सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ. सचिन पाटील यांचे मार्गदर्शन व संवाद साधता येणार असून अडीच हजार रुपयांच्या आरोग्य तपासण्या मोफत आहे. यावेळी वैद्यकीय व समाजसेवा या क्षेत्रातील अनुभवी व सेवाभावी व्यक्तिमत्त्वांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. कार्यक्रमामध्ये सर्वांना मोफत प्रवेश आहे परंतु प्रवेशासाठी नावनोंदणी अत्यावश्यक आहे. नावनोंदणीसाठी सचिन सुपरस्पेशालिटी क्लिनिक, राजारामपुरी येथे संपर्क साधावा. हृदयरोग आणि इतर रोगांविषयी जागृती निर्माण करून सर्वांना निरोगी आनंदी जीवनांची प्रेरणा देणाऱ्या या कार्यक्रमाचा सर्व कोल्हापूरकरांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Web Title: Commercial News: Sachin Super Specialty 'Live Meet Heart' on Sunday