वाणिज्य बातमी : वृत्तपत्रांनी समाजमन घडविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:15 IST2021-01-08T05:15:03+5:302021-01-08T05:15:03+5:30
कोल्हापूर : भारतीय वृत्तपत्र क्षेत्राला मोठी गौरवशाली परंपरा आहे. विविध कालखंडामध्ये वृत्तपत्रांनी समाजमन घडविण्याचे काम केले आहे, असे प्रतिपादन ...

वाणिज्य बातमी : वृत्तपत्रांनी समाजमन घडविले
कोल्हापूर : भारतीय वृत्तपत्र क्षेत्राला मोठी गौरवशाली परंपरा आहे. विविध कालखंडामध्ये वृत्तपत्रांनी समाजमन घडविण्याचे काम केले आहे, असे प्रतिपादन लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी लिमिटेडचे क्षेत्रिय व्यवस्थापक दिलीप पाटील यांनी केले. पत्रकार दिनानिमित्त बुधवारी लक्ष्मीपुरी येथील क्षेत्रीय कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकारांच्या सत्कार सोहळ्यानिमित्त ते बोलत होते.
पाटील म्हणाले, राजकीय असो वा सामाजिक क्षेत्रात, त्या त्या काळात पत्रकारांनी निर्भीड लिखाण करीत पत्रकारिता एका उंचीवर नेली आहे. त्याचेच अनुकरण आजच्या काळातही सुरू आहे. अनेक संकटे, अडचणी झेलत वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांचा या दिनाचे औचित्य साधून होत असलेला सन्मान आनंददायक आहे.
यानिमित्त पाटील यांच्याहस्ते ‘लोकमत’चे बातमीदार सचिन भोसले, ज्येष्ठ छायाचित्रकार नसीर अत्तार, पुण्यनगरीचे वैभव गोंधळी आदींचा भेटवस्तू व गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. आभार सहायक क्षेत्रीय व्यवस्थापक आर. डी. पाटील यांनी आभार मानले. यावेळी ऋतुराज दळवी, अवधूत जांभळीकर, सदानंद भोसले आदी उपस्थित होते.
फोटो - ०६०१२०२१-कोल-नसीर अत्तार
आेळी :
पत्रकार दिनानिमित्त लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी लिमिटेडच्या लक्ष्मीपुरी क्षेत्रीय कार्यालयात बुधवारी ‘लोकमत’चे ज्येष्ठ छायाचित्रकार नसीर अत्तार यांचा सत्कार क्षेत्रीय व्यवस्थापक दिलीप पाटील यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी सहायक क्षेत्रीय व्यवस्थापक आर. डी. पाटील उपस्थित होते.