वाणिज्य बातमी : युनिक ऑटोमोबाईल्सतर्फे कार्निव्हल आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:22 IST2021-01-17T04:22:31+5:302021-01-17T04:22:31+5:30
या कार्निव्हलमध्ये टू व्हीलरपासून फोर व्हीलर ब्रँडच्या सर्व गाड्या ग्राहकांना एकाच छताखाली पाहण्यास मिळणार आहेत. युनिक ग्रुपकडे असणाऱ्या हिरो ...

वाणिज्य बातमी : युनिक ऑटोमोबाईल्सतर्फे कार्निव्हल आयोजन
या कार्निव्हलमध्ये टू व्हीलरपासून फोर व्हीलर ब्रँडच्या सर्व गाड्या ग्राहकांना एकाच छताखाली पाहण्यास मिळणार आहेत. युनिक ग्रुपकडे असणाऱ्या हिरो टू व्हीलर्सबरोबर हुंडाई, फोर्ड, रेनाॅल्ट, फोक्स वॅगन व एम. जी. या सर्व जगप्रसिद्ध ब्रँडच्या नवीन फोर व्हीलर याही कार्निव्हलमध्ये ग्राहकांना पाहता येणार आहेत. नवीन कार्सबरोबर युज कार्सचीसुद्धा भरपूर श्रेणी या ठिकाणी उपलब्ध आहेत. अत्यंत कमी किमतीपासून युज कार्स उपलब्ध असल्यामुळे ग्राहकांना हा कार्निव्हल म्हणजे पर्वणीच आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे या सर्व टू व्हीलर व फोर व्हीलर गाड्यांसाठी अत्यंत कमी डाऊन पेमेंट व कमी व्याजदरात ९० टक्क्यांपर्यंत कर्जपुरवठा उपलब्ध आहे. बँक ऑफ महाराष्ट्र, पंजाब नॅशनल बँक यांसारख्या सरकारी बँकांमार्फत कर्जपुरवठा उपलब्ध आहे.
फोटो : १६०१२०२१-कोल-युनिक ऑटोमोबाईल
ओळी : युनिक ऑटोमोबाईल्स ग्रुप ऑफ कंपनीजतर्फे कोल्हापुरातील निर्माण चौकात आयोजित केलेल्या ऑटो काॅर्निव्हलचे शनिवारी नगरसेवक सत्यजित कदम यांच्या हस्ते उद्घाटन झाले.