वाणिज्य वृत्त : बिकानेर स्वीट्सचे थाटात उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:30 IST2021-02-27T04:30:08+5:302021-02-27T04:30:08+5:30

कोल्हापूर : दसरा चौकात नव्याने सुरू झालेल्या बिकानेर स्वीट्स मार्टचे उद्घाटन खासदार संजय मंडलिक यांच्या हस्ते झाले. उद्घाटनानंतर बोलताना ...

Commercial News: Bikaner Sweets inaugurated in Thatta | वाणिज्य वृत्त : बिकानेर स्वीट्सचे थाटात उद्घाटन

वाणिज्य वृत्त : बिकानेर स्वीट्सचे थाटात उद्घाटन

कोल्हापूर : दसरा चौकात नव्याने सुरू झालेल्या बिकानेर स्वीट्स मार्टचे उद्घाटन खासदार संजय मंडलिक यांच्या हस्ते झाले. उद्घाटनानंतर बोलताना कोल्हापुरातील चोखंदळ ग्राहकांच्या हे मार्ट पसंतीस उतरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

नावीन्यपूर्ण पद्धतीने बनविलेल्या अनेक नवीन मिठाई येथे उपलब्ध असतील. या स्वीट मार्टमध्ये ड्रायफ्रूट्स मिठाई, दुधाची मिठाई, बंगाली मिठाई, तुपातील मिठाई, खव्याची मिठाई व नमकीनचे असंख्य प्रकार, तसेच बेकरी उत्पादने मिळतील, असे नाथा चौगुले यांनी सांगितले. यावेळी मांगीलाल चौधरी, भानाराम चौधरी, इंदरलाल चौधरी, सतीश पाटील, मिलिंद चौगुले, सौ. नंदिनी चौगुले, पूनम चौगुले, राजेश पाटील, नम्रता नंदेश्वर, आदी मान्यवर उपस्थित होते.

फोटो: २६०२२०२१-कोल- स्वीट मार्ट

फोटो ओळ : कोल्हापुरातील दसरा चौकातील बिकानेर स्वीट्स मार्टचे उद्घाटन खासदार संजय मंडलिक यांच्या हस्ते झाले. यावेळी मान्यवर उपस्थित होते.

Web Title: Commercial News: Bikaner Sweets inaugurated in Thatta