वाणिज्य बातमी : भंडारी ग्रुपची वाटचाल इतरांना प्रेरणादायी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:22 IST2021-01-17T04:22:33+5:302021-01-17T04:22:33+5:30
कोल्हापूर : प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत भंडारी कुटुंबाने सुरू केलेल्या भंडारी ग्रुपचे वटवृक्षात रूपांतर व्हावे, अशी सदिच्छा खासदार संभाजीराजे ...

वाणिज्य बातमी : भंडारी ग्रुपची वाटचाल इतरांना प्रेरणादायी
कोल्हापूर : प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत भंडारी कुटुंबाने सुरू केलेल्या भंडारी ग्रुपचे वटवृक्षात रूपांतर व्हावे, अशी सदिच्छा खासदार संभाजीराजे यांनी शनिवारी व्यक्त केली. भंडारी ग्रुपच्या ई-काॅमर्स संकेतस्थळ व भंडारी मॅचीसच्या अनावरण कार्यक्रमात ते बोलत होते.
खासदार संभाजीराजे म्हणाले, माझा सामान्य माणूस माझ्यापेक्षा मोठा व्हावा या उद्देशाने राजर्षी शाहू महाराजांनी त्या काळी गंगाराम कांबळे यांना हाॅटेल सुरू करण्यास सांगितले. आज भंडारी ग्रुपने पानाच्या अडत व्यवसायाचा विस्तार मसाले, ड्रायफ्रुट्स, आदींच्या व्यवसायात केला आहे. त्यात कार्पोरेट व्यवसाय करण्याचे पाऊल निश्चितच इतरांनाही प्रेरणादायी ठरणारे आहे. अध्यक्षस्थानावरून बोलताना माजी सहायक पोलीस आयुक्त जयसिंगराव पाटील यांनी भंडारी ग्रुपने व्यवसाय विस्ताराबरोबरच इतरांचा उत्कर्ष करण्यासाठी उचललेले पाऊल निश्चितच कौतुकास्पद आहे, असे मत व्यक्त केले. स्वागत विजयकुमार भंडारी यांनी केले. यावेळी ग्रुपचे संस्थापक नामदेवराव भंडारी, अजयकुमार भंडारी, आदी उपस्थित होते.
फोटो : १६०१२०२१-कोल-भंडारी ग्रुप०२
आेळी : कोल्हापुरात भंडारी ग्रुपच्यावतीने खासदार संभाजीराजे यांच्या हस्ते भंडारी मॅचीसचे अनावरण झाले. यावेळी विजयकुमार भंडारी, जयसिंगराव पाटील, नामदेव भंडारी, अजयकुमार भंडारी उपस्थित होते.