वाणिज्य बातमी : पाटणकर दिनानिमित्त विविध कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:31 IST2020-12-30T04:31:00+5:302020-12-30T04:31:00+5:30

कोल्हापूर : नागोजीराव पाटणकर हायस्कूल मराठी शाळा, अभिनव बालक मंदिरच्यावतीने शनिवारी पाटणकर दिन व रोटरी इंटरॅक्ट क्लब पदग्रहण समारंभ ...

Commerce News: Various programs on the occasion of Patankar Day | वाणिज्य बातमी : पाटणकर दिनानिमित्त विविध कार्यक्रम

वाणिज्य बातमी : पाटणकर दिनानिमित्त विविध कार्यक्रम

कोल्हापूर : नागोजीराव पाटणकर हायस्कूल मराठी शाळा, अभिनव बालक मंदिरच्यावतीने शनिवारी पाटणकर दिन व रोटरी इंटरॅक्ट क्लब पदग्रहण समारंभ झाला. यावेळी अनुषा पाटील यांची इंटरॅक्ट क्लबच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. यावेळी विविध कार्यक्रम झाले.

पाटणकर ट्रस्टचे सेक्रेटरी एन.एल. ठाकूर यांनी शाळेच्या प्रगतीचा आढावा घेऊन लॉकडाऊनच्या काळात केलेल्या शैक्षणिक कार्याची माहिती दिली. रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सेंट्रलचे सूर्यकांत पाटील यांनी पाटणकर कुटुंबियांनी समाजसेवेचे व्रत हाती घेतले असून, सामाजिक सेवेची बांधिलकची परंपरा जपल्याचे सांगितले. रोटरॅक्ट क्लबच्या कार्याची माहितीही त्यांनी दिली. पाटणकर ट्रस्टचे अध्यक्षपदी बाळ पाटणकर यांनी मनोगत व्यक्त केले.

ऑनलाईन चित्रकला स्पर्धा व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शहीद अभिजित सूर्यवंशी यांच्या स्मरणार्थ विद्यार्थ्यांसाठी एनसीसी बेस्ट कँडिडेट म्हणून पारितोषिक जाहीर केले. यावेळी जिया मोमीन, सिद्धार्थ पाटणकर, प्रकाश जगदाळे आदी उपस्थित होतेे.

फोटो :२९१२२०२० कोल रोटरी न्यूज

ओळी : नागोजीराव पाटणकर हायस्कूल मराठी शाळा, अभिनव बालक मंदिरच्यावतीने शनिवारी पाटणकर दिन व रोटरी इंटरॅक्ट क्लब पदग्रहण समारंभ झाला. यावेळी अनुषा पाटील, प्रकाश जगदाळे, बाळ पाटणकर, सूर्यकांत पाटील, एन. एल. ठाकूर, सिद्धार्थ पाटणकर उपस्थित होते.

Web Title: Commerce News: Various programs on the occasion of Patankar Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.