वाणिज्य वृत्त: आसमाच्या अध्यक्षपदी सुनील बासरानी यांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:23 IST2021-01-25T04:23:26+5:302021-01-25T04:23:26+5:30

कोल्हापूर : आसमाच्या अध्यक्षपदी आयमॅक्स ॲडव्हर्टायझर्सचे सुनील बासरानी, उपाध्यक्षपदी जयेंद्र पब्लिसिटीचे पी. एस. कुलकर्णी, तर सचिवपदी कला कल्पनाचे संजीव ...

Commerce News: Sunil Basrani elected as President of Assam | वाणिज्य वृत्त: आसमाच्या अध्यक्षपदी सुनील बासरानी यांची निवड

वाणिज्य वृत्त: आसमाच्या अध्यक्षपदी सुनील बासरानी यांची निवड

कोल्हापूर : आसमाच्या अध्यक्षपदी आयमॅक्स ॲडव्हर्टायझर्सचे सुनील बासरानी, उपाध्यक्षपदी जयेंद्र पब्लिसिटीचे पी. एस. कुलकर्णी, तर सचिवपदी कला कल्पनाचे संजीव चिपळूणकर, खजानीसपदी अलंकार पब्लिसिटीचे राजाराम शिंदे यांची एकमताने निवड झाली. निवड सभेच्या अध्यक्षस्थानी महादेव शिंदे होते.

कोल्हापूर, सांगली, साताऱ्यासह दक्षिण महाराष्ट्र माध्यमे व विविधप्रकारे जाहिरात सेवा एजन्सीज आणि जाहिरातपूरक सेवा देणाऱ्या एजन्सीज यांची शिखर असलेल्या आसमा या संस्थेची २०२१-२३ या द्वीवार्षिक काळासाठी नूतन कार्यकारिणी एकमताने निवडण्यात आली.

अन्य कार्यकारिणीमध्ये संचालक म्हणून जेनेसिस कम्युनिकेशनचे राजीव परुळेकर, कॉम्पार्ट डिझाईनचे महादेव शिंदे, ग्रॅव्हिटीचे विवेक मंद्रुपकर, लुकतुके पब्लिसिटीचे सुहास लुकतुके, संज्योती ग्राफिक्सचे संजय रणदिवे, अभय पब्लिसिटीचे अभय मिराशी, एम एम क्रिएशनचे अनिरुध्द गुमास्ते, विश्व ॲडव्हर्टायझिंगचे अविनाश पेंडूरकर, इंप्रेशन पब्लिसिटीचे सुनील बनगे, स्नेह पब्लिसिटीचे प्रशांत बुचडे, मॉडिफाईड डिझाईनचे संतराम चौगुले यांची सर्वानुमते निवड झाली.

फोटो: २३०१२०२१-कोल-आसमा फोटो

(सर्व फोटो सिंगल आहेत)

Web Title: Commerce News: Sunil Basrani elected as President of Assam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.