वाणिज्य वृत्त : भंडारी ग्रुपच्या घरपोच सेवेला उत्स्फूर्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:22 IST2021-05-15T04:22:40+5:302021-05-15T04:22:40+5:30

कोल्हापूर : कोल्हापूरकरांची पहिली पसंती असणाऱ्या भंडारी ग्रुपच्या दर्जेदार उत्पादनांची कोरोनाकाळात घरपोच सेवा उपलब्ध झाली आहे. फोन आणि ...

Commerce News: Spontaneous response to Bhandari Group's home delivery service | वाणिज्य वृत्त : भंडारी ग्रुपच्या घरपोच सेवेला उत्स्फूर्त प्रतिसाद

वाणिज्य वृत्त : भंडारी ग्रुपच्या घरपोच सेवेला उत्स्फूर्त प्रतिसाद

कोल्हापूर : कोल्हापूरकरांची पहिली पसंती असणाऱ्या भंडारी ग्रुपच्या दर्जेदार उत्पादनांची कोरोनाकाळात घरपोच सेवा उपलब्ध झाली आहे. फोन आणि व्हॉटस्‌ ॲपवरून सामानाची यादी दिली की माल मोफत घरपोच दिला जात आहे. रास्त दर, निवडक माल आणि योग्य व तत्पर सेवेमुळे घरपोच सेेवेला अल्पावधीतच चांगला प्रतिसाद मिळत आहे.

लक्ष्मीपुरी येथील भंडारी ग्रुपने स्वच्छ आणि निवडलेले खात्रीचे मसाले रास्त भावात मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणून ग्राहकांच्या मनात विश्वासाचे नाते निर्माण केले आहे. गुणवत्ता, विनम्र सेवा व योग्य किंमत हे ब्रीद दुकानाने चांगले जपले आहे. अत्युच्च प्रतीचे मसाले येथे उपलब्ध आहे. चटणी व घरगुती जेवणासाठी लागणारे मसाले हजर स्टॉकमध्ये उपलब्ध आहे. भंडारी माचीसलाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. ही सर्व उत्पादने घरपोच मिळवून कोरोनाच्या संसर्गापासून लांब राहा, असे आवाहन केले आहे.

फोटो: १४०५२०२१-कोल-भंडारी न्यूज

Web Title: Commerce News: Spontaneous response to Bhandari Group's home delivery service