वाणिज्य वृत्त : रोटरी क्लब ऑफ होरायझनचा पदग्रहण साेहळा उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 04:38 IST2020-12-12T04:38:59+5:302020-12-12T04:38:59+5:30
मावळते अध्यक्ष समीर पाटील यांनी प्रास्ताविक केले, अभयसिंह बिचकर यांनी वर्षभराचा आढावा घेतला. पदग्रहण समारंभानंतर अतुल पाटील यांनी आपले ...

वाणिज्य वृत्त : रोटरी क्लब ऑफ होरायझनचा पदग्रहण साेहळा उत्साहात
मावळते अध्यक्ष समीर पाटील यांनी प्रास्ताविक केले, अभयसिंह बिचकर यांनी वर्षभराचा आढावा घेतला. पदग्रहण समारंभानंतर अतुल पाटील यांनी आपले डायरेक्टर बोर्ड प्रस्तुत केले तसेच पुढील वर्षात केल्या जाणाऱ्या कामाचा आराखडा सभेसमोर ठेवला. यावेळी मार्गदर्शन करता कौस्तुभ नाबर यांच्या हस्ते उदय दुधाणे, गिरीश चिककोडी, देव बांदेकर व पवन रोचलानी यांना क्लबमध्ये प्रवेश देण्यात आला. यानंतर माजी असिस्टंट गव्हर्नर एम. वाय. पाटील, सध्याचे गव्हर्नर बी. वाय. कडोलकर यांची भाषणे झाली. रवीकुमार यांनी आभार मानले. यावेळी ज्येष्ठ रोटेरियन नरेंद्र झंवर, अमरदीप पाटील, एम. बी शेख, हृषिकेश केसकर, सदानंद कोठावळे, मिलिंद आळवेकर, अमोल जमदग्नी तसेच रोटरीचे सदस्य व त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने हजर होते.
फोटो: १११२२०२०-कोल-रोटरी न्यूज
फोटो ओळ: रोटरी क्लब ऑफ होरायझनच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा हॉटेल सयाजी येथे मोठ्या उत्साहात झाला.