वाणिज्य वृत्त : संयुक्त शिवजयंती उत्सव समितीकडून अडीच लाख शेणी दान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:24 IST2021-03-31T04:24:06+5:302021-03-31T04:24:06+5:30

कोल्हापूर : क्रशर चौकातील संयुक्त उपनगर शिवजयंती उत्सव समितीचे वतीने यंदाही होळी निमित्त अडीच लाख शेणी संकलित केल्या गेल्या. ...

Commerce News: Joint Shiv Jayanti Festival Committee donates 2.5 lakh sheni | वाणिज्य वृत्त : संयुक्त शिवजयंती उत्सव समितीकडून अडीच लाख शेणी दान

वाणिज्य वृत्त : संयुक्त शिवजयंती उत्सव समितीकडून अडीच लाख शेणी दान

कोल्हापूर : क्रशर चौकातील संयुक्त उपनगर शिवजयंती उत्सव समितीचे वतीने यंदाही होळी निमित्त अडीच लाख शेणी संकलित केल्या गेल्या. क्रांतिसिंह नाना पाटील नगर चौकात झालेल्या कार्यक्रमात या शेणी पालिका आयुक्त कादंबरी बलकवडे व माजी आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी यांच्याकडे सुपूर्द केल्या.

दक्षिण विधानसभा मतदारसंघात समाविष्ट महानगरपालिकेच्या विविध प्रभागांतील युवा मंडळांची शिखरसंस्था असलेल्या संयुक्त उपनगर शिवजयंती उत्सव समितीचे वतीने संस्थापक नगरसेवक शारंगधर देशमुख यांनी ‘होळी करा, लहान शेणी करा दान’ असे आवाहन केले होते. त्याला नागरिकांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला. कलशेट्टी यांनी विधायक सामाजिक उपक्रमांत नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन केले. नगरसेवक देशमुख यांनी संकलित निधीतून समाजविधायक उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे सांगितले. चंद्रकांत कांबळे, सचिन चौगुले,वसंतराव देशमुख, दिग्विजय मगदूम, माजी नगरसेवक अभिजित चव्हाण, रिना कांबळे, श्रद्धा महागावकर, पल्लवी बोळाइकर, वैशाली किरण पाटील, भिकाजी गावकर युवा कार्यकर्ते परिसरातील मान्यवर व नागरिक उपस्थित होते.

फोटो ३००३२०२१-कोल-होळी ०१

क्रशर चौकात संयुक्त उपनगर शिवजयंती उत्सव समितीच्यावतीने अडीच लाख शेणी पालिका आयुक्त कादंबरी बलकवडे व माजी आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी यांच्याकडे नगरसेवक शारंगधर देशमुख व कार्यकर्त्यांनी सुपूर्द केल्या.

Web Title: Commerce News: Joint Shiv Jayanti Festival Committee donates 2.5 lakh sheni

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.