वाणिज्य बातमी (जीएम सर) : नागोजीराव पाटणकर इंटरॅक्ट क्लबमध्ये सावित्रीबाई फुले जयंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:14 IST2021-01-08T05:14:54+5:302021-01-08T05:14:54+5:30
कोल्हापूर : रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सेंट्रल व नागोजीराव पाटणकर इंटरॅक्ट क्लब यांच्यावतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती व महिला ...

वाणिज्य बातमी (जीएम सर) : नागोजीराव पाटणकर इंटरॅक्ट क्लबमध्ये सावित्रीबाई फुले जयंती
कोल्हापूर : रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सेंट्रल व नागोजीराव पाटणकर इंटरॅक्ट क्लब यांच्यावतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती व महिला शिक्षण दिन उत्साहात साजरा करण्यात आला. रोटरी क्लबचे सचिव स्वप्नील मुधाळे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन झाले. अध्यक्षस्थानी रोटरी क्लबचे अध्यक्ष सूर्यकांत पाटील होते.
नागोजीराव पाटणकर हायस्कूलमध्ये झालेल्या या कार्यक्रमात महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याची ओळख मान्यवरांनी करुन दिली. यानिमित्त विद्यार्थिनींसह शिक्षिकांचा स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. स्वागत विद्यार्थिनी अनुषा पाटील हिने केले तर श्रुती माळवदे हिने आभार मानले. सूत्रसंचालन मधुरा जाधव, रिया कीर्ती यांनी केले. या कार्यक्रमाला संस्थेचे चेअरमन आर. ए. उर्फ बाळ पाटणकर यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी सिद्धार्थ पाटणकर, संस्था सचिव एन. एल. ठाकूर, मुख्याध्यापक एस. आर. गुरव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
फोटो : ०४०१२०२१-कोल-पाटणकर
ओळी : कोल्हापुरातील नागोजीराव पाटणकर हायस्कूलमध्ये सावित्रीबाई फुले जयंती व महिला दिनानिमित्त शाळेची विद्यार्थिनी अनुषा पाटील हिचा स्वप्नील मुधाळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी एन. एल. ठाकूर, सूर्यकांत पाटील, सिद्धार्थ पाटणकर आदी उपस्थित होते.