वाणिज्य वृत्त: सम्राट फ्रेंड सर्कलने गोरगरिबांना पुरवले चमचमीत जेवण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:18 IST2021-05-28T04:18:29+5:302021-05-28T04:18:29+5:30
कोल्हापूर : लॉकडाऊन काळात गोरगरिबांचाही रविवारचा दिवस चमचमीत भोजन घेऊन जावा म्हणून सम्राटनगरातील सम्राट फ्रेंड सर्कलने अनोखा उपक्रम राबवत ...

वाणिज्य वृत्त: सम्राट फ्रेंड सर्कलने गोरगरिबांना पुरवले चमचमीत जेवण
कोल्हापूर : लॉकडाऊन काळात गोरगरिबांचाही रविवारचा दिवस चमचमीत भोजन घेऊन जावा म्हणून सम्राटनगरातील सम्राट फ्रेंड सर्कलने अनोखा उपक्रम राबवत त्यांना मांसाहारी जेवणाचे पाकीट पुरवले. मंडळातर्फे गेले नऊ दिवसांपासून रोज ५०० गोरगरीब वंचिताना जेवणाचे पाकीट पुरवून त्यांची भूक भागवली जात आहे.
गोरगरिबांचे जेवणाचे हाल होत असल्याने सम्राट फ्रेंड सर्कलने अन्न तयार करुन तो पॅकेटच्या माध्यमातून गरजूपर्यंत पोहचवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. तरुण कार्यकर्ते रस्त्यावर फिरुन गरजूंना अन्न देऊन त्यांची भूक शमवण्याचे काम करत आहे. रविवारी कोल्हापुरात घराघरात मांसाहार असतो, या गरीबांना ते कधी मिळणार या भावनेतून या तरुणांनी जेवण तयार करून ते पाकीटातून दसरा चौक, रेल्वे स्टेशन, बस स्टॅन्ड, गंगावेश स्टॅन्ड, भवानी मंडप, आयसोलेशन हॉस्पिटल, पंचगंगा स्मशानभूमी, सरस्वती टॉकीज, सावित्रीबाई फुले हॉस्पिटल येथे बसणाऱ्या गोरगरिबांना वाटण्यात आली.
फोटो: २७०५२०२१-कोल-सम्राट मित्र मंडळ
फोटो ओळ: कोल्हापुरातील सम्राटनगर येथील सम्राट फ्रेंड सर्कलतर्फे रेल्वे स्टेशनवरील गरजूंना अन्नाची पाकीटे वाटण्यात आली.