वाणिज्य : बँक ऑफ महाराष्ट्र क्रेडिट कार्डचे लोकार्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:25 IST2021-01-03T04:25:59+5:302021-01-03T04:25:59+5:30
कोल्हापूर : बॅंक ऑफ महाराष्ट्र या महाबँकेच्या क्रेडिट कार्डचे वितरण शुक्रवारी करण्यात आले. ‘बॅंक ऑफ महाराष्ट्र क्रेडिट कार्ड’ या ...

वाणिज्य : बँक ऑफ महाराष्ट्र क्रेडिट कार्डचे लोकार्पण
कोल्हापूर : बॅंक ऑफ महाराष्ट्र या महाबँकेच्या क्रेडिट कार्डचे वितरण शुक्रवारी करण्यात आले. ‘बॅंक ऑफ महाराष्ट्र क्रेडिट कार्ड’ या सुविधेचे ग्राहकांसाठी लोकार्पण करण्यात आले. बॅंकेचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी ए. एस. राजीव यांच्या हस्ते ही सेवा सुरु करण्यात आली. यावेळी प्रादेशिक व्यवस्थापक संदीपकुमार चौरसिया, उपप्रादेशिक व्यवस्थापक जी. एस. प्रसाद उपस्थित होते. बँकेचा ग्राहक मेळावा व सर्व शाखा व्यवस्थापकांची यावेळी बैठक घेण्यात आली. या मेळाव्याला मोठ्या प्रमाणात ग्राहक व शाखाधिकारी उपस्थित होते.
यावेळी राजीव म्हणाले, रिटेल कर्ज विभागातील स्पर्धात्मक व्याजदरामध्ये बॅंक ऑफ महाराष्ट्र ही सार्वजनिक बॅंकांमध्ये अग्रगण्य बॅंक आहे. महाबॅंकेच्या कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील सर्व शाखांनी गृहकर्ज, वाहन कर्ज, सोनेतारण कर्ज, व्यवसाय कर्ज, कृषी कर्ज व महाबॅंक सॅलरी अकाऊंट स्कीममध्ये केलेली कामगिरी कौतुकास्पद आहे.
चौकट
गोल्ड लोन पॉईंटमुळे १५ मिनिटात कर्ज
विभागीय व्यवस्थापक संदीपकुमार चौरसिया यांनी विविध योजना व ग्राहक सेवांसोबतच गृहकर्ज, वाहन कर्ज, सोनेतारण कर्ज, देश-विदेशात शिक्षण घेण्यासाठी कर्ज, वैयक्तिक कर्ज आणि मालमत्ता तारण कर्जासह बँकेच्या विविध योजनांचा ग्राहकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन केले. राजारामपुरीतील गोल्ड लोन पॉईंट योजनेत कृषी व रिटेल गोल्डचे अत्यंत कमी व्याजदरात केवळ १५ मिनिटात कर्ज देण्यात येते. याचा कोल्हापूर शहर आणि आसपासच्या ग्राहकांना फायदा होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
फोटो : ०२०१२०२० कोल बँक ऑफ महाराष्ट्र न्यूज
ओळी : कोल्हापुरात बॅंक ऑफ महाराष्ट्र क्रेडिट कार्डचे शुक्रवारी ग्राहकांना वितरण करण्यात आले. यावेळी बॅंकेचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी ए. एस. राजीव, प्रादेशिक व्यवस्थापक संदीपकुमार चौरसिया उपस्थित होते.