कॉमर्स कॉलेजची ‘विवेकानंद’वर मात

By Admin | Updated: December 13, 2014 00:15 IST2014-12-13T00:08:49+5:302014-12-13T00:15:09+5:30

‘केएसए’ चषक क्रिकेट स्पर्धा

Commerce College defeats Vivekananda | कॉमर्स कॉलेजची ‘विवेकानंद’वर मात

कॉमर्स कॉलेजची ‘विवेकानंद’वर मात

कोल्हापूर : १९ वर्षांखालील ‘केएसए’ चषक ज्युनिअर कॉलेज क्रिकेट स्पर्धेत आज, शुक्रवारी झालेल्या सामन्यात कॉमर्स कॉलेजने स्वामी विवेकानंद कॉलेजचा दोन गडी राखून पराभव करीत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. उद्या, शनिवारी अंतिम सामन्यात ‘कॉमर्स’ची गाठ महावीर कॉलेजशी पडणार आहे.
शाहू स्टेडियम येथे कॉमर्स कॉलेज विरुद्ध स्वामी विवेकानंद कॉलेज यांच्यात झालेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ‘विवेकानंद’ने २९ षटकांत सर्वबाद १२० धावा केल्या. यामध्ये सिद्धार्थ कोठारेने ३६, राज इंचनाळकरने २६ धावा केल्या. गोलंदाजी करताना ‘कॉमर्स’कडून कौस्तुभ रावणेने ३, शुभम मेढेने २, तर सौरभ श्रृंगारे व चेतन नार्वेकर यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.
उत्तरादाखल खेळताना कॉमर्स कॉलेजने २८ षटकांत ८ बाद १२१ धावा करून दोन गडी राखून विजय संपादन करीत अंतिम फेरीत प्रवेश केला. यामध्ये सौरभ श्रृंगारेने ३५, परितोष व्हराडकरने १९, साहिल पाटीलने १२, तर शुभम मेढेने १० धावा केल्या.
गोलंदाजी करताना स्वामी विवेकानंदकडून साहिल शिबे व राज इंचनाळकर यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले, तर साद मुजावर, आदित्य फाळके यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. त्यांनी अवांतर १६ धावा दिल्या.

Web Title: Commerce College defeats Vivekananda