वाणिज्य...भंडारी ग्रुप स्थापन करणार सेवा रुग्णालय : विजय भंडारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:14 IST2021-02-05T07:14:25+5:302021-02-05T07:14:25+5:30
कोल्हापूर : सामान्य, गरजू लोकांसाठी भंडारी ग्रुप सेवा रुग्णालयाची स्थापना करणार असल्याचा संकल्प ग्रुपचे अध्यक्ष विजय भंडारी यांनी केला ...

वाणिज्य...भंडारी ग्रुप स्थापन करणार सेवा रुग्णालय : विजय भंडारी
कोल्हापूर : सामान्य, गरजू लोकांसाठी भंडारी ग्रुप सेवा रुग्णालयाची स्थापना करणार असल्याचा संकल्प ग्रुपचे अध्यक्ष विजय भंडारी यांनी केला आहे. ग्रुपचे उपाध्यक्ष अजय भंडारी यांच्या वाढदिवसानिमित्त विजय भंडारी यांनी ही घोषणा केली.
समाजाने आपणाला मोठे केले, त्या बदल्यात आपण काही तरी देणे लागतो. या भावनेतून समाजातील गोरगरिबांसाठी सेवा रुग्णालय उभा करत असल्याचे विजय भंडारी यांनी सांगितले.
अजय भंडारी यांच्या वाढदिवसानिमित्त सावित्रीबाई फुले रुग्णालयाला मॉप ट्रॉली, नीडल कटर, औषध बॉक्स आदी साहित्य दिले. यावेळी महापालिकेचे प्रशासकीय वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश पावरा, डॉ. मंजुश्री रोहिदास, भंडारी ग्रुपचे सदस्य विजय देसाई, अविनाश पोवार, संदीप पाटील, सागर शिंगटे, मुन्ना चौधरी, दर्शन हांजे, सोमनाथ दिवटे, अक्षय नाईक, सुशांत भंडारी, शिवम जंगम, आदी उपस्थित होते.
फोटो ओळी : भंडारी ग्रुपच्या वतीने सावित्रीबाई फुले रुग्णालयाला साहित्य देण्यात आले. (फाेटो - ३००१२०२१-कोल-भंडारी ग्रुप)