निपाणीत वित्त आयोगातून विविध विकासकामांचा प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:00 IST2021-02-05T07:00:44+5:302021-02-05T07:00:44+5:30

निपाणी : चौदाव्या व पंधराव्या वित्त आयोगातून प्रत्येकी १ कोटी ७० लाख व २ कोटी ५० लाखांच्या निधीतून निपाणी ...

Commencement of various development works from Nipani Finance Commission | निपाणीत वित्त आयोगातून विविध विकासकामांचा प्रारंभ

निपाणीत वित्त आयोगातून विविध विकासकामांचा प्रारंभ

निपाणी : चौदाव्या व पंधराव्या वित्त आयोगातून प्रत्येकी १ कोटी ७० लाख व २ कोटी ५० लाखांच्या निधीतून निपाणी शहरातील विविध प्रभागांमध्ये विकासकामांचा प्रारंभ करण्यात आला आहे. येत्या काळातही अन्य प्रभागांत विकासकामे जोमाने राबवणार असून निपाणीत दर्जेदार विकासकामे करणार आहे, अशी माहिती नगराध्यक्ष जयवंत भाटले यांनी दिली. निपाणी नगरपालिकेतील त्यांच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

निपाणी शहरातील विविध प्रभागांमध्ये सोमवारी चौदाव्या व पंधराव्या वित्त आयोगातून विकासकामाचे उद्घाटन करण्यात आले. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. प्रारंभी सभापती सदाम नगारजी यांनी स्वागत केले.

नगराध्यक्ष भाटले म्हणाले की, ३२ लाखांच्या निधीतून प्रभाग नंबर १८, २१, २२ व २५ मध्ये गटारीच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे, तर ३४ लाखांच्या निधीतून प्रभाग नंबर २६ मध्ये कामाचा प्रारंभ करण्यात आला आहे. प्रभाग नंबर १२, ३० व २९ मध्ये लवकरच कामाचा प्रारंभ करण्यात येणार आहे.

१४ व्या वित्त आयोगातून पाईपलाईन दुरुस्तीसाठी २० लाखांचा निधी देण्यात आला आहे. जवाहर तलाव परिसरात लाईट सुविधेसाठी पाच लाखांचा निधी दिला आहे.

यावेळी नगरसेवक विनायक वडे, नगरसेविका आशा टवळे, सोनल उपाध्ये, दत्ता जोत्रे, विजय टवळे, महेश सूर्यवंशी, आदी उपस्थित होते.

फोटो

नगराध्यक्ष जयवंत भाटले

Web Title: Commencement of various development works from Nipani Finance Commission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.