शाहूवाडीत स्वाभिमानीच्या सभासद नोंदणीस प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:23 IST2021-03-25T04:23:14+5:302021-03-25T04:23:14+5:30
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शाहूवाडी तालुक्यात सभासद नोंदणी अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे, युवा आघाडी ...

शाहूवाडीत स्वाभिमानीच्या सभासद नोंदणीस प्रारंभ
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शाहूवाडी तालुक्यात सभासद नोंदणी अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे, युवा आघाडी जिल्हाध्यक्ष सागर संभूशेटे यांच्या प्रमुख उपस्थितीत शाहूवाडी तालुक्यात या सभासद नोंदणी अभियानास प्रारंभ झाला.
सध्या संघटनेच्या वतीने राज्यभर सभासद नोंदणीचा कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे.
संघटनेच्या माध्यमातून भात उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आगामी काळात मोठा लढा उभा करण्यात येणार असल्याची माहिती वैभव कांबळे व सागर संभूशेटे यांनी दिली. यावेळी तालुकाध्यक्ष जयसिंग पाटील-चरणकर विजय पाटील, सुरेश म्हाऊटकर, संतोष पाटील, संजय केळसकर, रंगराव चिले, ए. के. जाधव, रायसिंग पाटील, गुरुनाथ शिंदे, पद्मसिंह पाटील , भैय्या थोरात उपस्थित होते.