कोवाड बंधाऱ्याच्या दुरूस्ती कामास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:24 IST2021-03-27T04:24:12+5:302021-03-27T04:24:12+5:30
१९६७ मध्ये कोवाड येथील ताम्रपर्णी नदीवर कोल्हापूर पद्धतीचा बंधारा बांधण्यात आला आहे. चार-पाच वर्षांपासून संबंधित बंधाऱ्याचे पिलर ढासळत आहेत. ...

कोवाड बंधाऱ्याच्या दुरूस्ती कामास प्रारंभ
१९६७ मध्ये कोवाड येथील ताम्रपर्णी नदीवर कोल्हापूर पद्धतीचा बंधारा बांधण्यात आला आहे. चार-पाच वर्षांपासून संबंधित बंधाऱ्याचे पिलर ढासळत आहेत. त्यामुळे बंधाऱ्यात पाणी साठण्याचे प्रमाण अत्यंत कमी आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात शेती व पिण्यासाठी पाणी टंचाई जाणवते. याची दखल घेऊन बंधाऱ्यासाठी ४४ लाखांचा निधी उपलब्ध झाला आहे.
याप्रसंगी कार्यकारी अभियंता स्मिता माने, उपअभियंता तुषार पवार, पी. एम. अर्जुनवाडकर, शाखा अभियंता परेश पोकळे, अशोक देसाई, शंकर पाटील, वसंत व्हन्याळकर, विष्णू आडाव, श्रीकांत पाटील, संदीप बिर्जे, दत्ता पाटील, चाळोबा पाटील, दयानंद सलाम आदी उपस्थित होते.
-------------------------
* फोटो ओळी : कोवाड (ता. चंदगड) येथील ताम्रपर्णी नदीवरील बंधारा दुरूस्तीच्या कामाचा प्रारंभ आमदार राजेश पाटील यांच्याहस्ते झाला. यावेळी स्मिता माने, तुषार पवार, अशोक देसाई, विष्णू आडाव आदी उपस्थित होते.
क्रमांक : २६०३२०२१-गड-०४