कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी चाचणीसाठी पुढे या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:29 IST2021-07-14T04:29:20+5:302021-07-14T04:29:20+5:30
साळशीपैकी पोवारवाडी (ता. शाहूवाडी) येथे कोरोना रुग्णांच्या संपर्कातील नागरिकांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग अंतर्गत आरोग्य विभागाच्यावतीने स्वॅब तपासणी सुरू ...

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी चाचणीसाठी पुढे या
साळशीपैकी पोवारवाडी (ता. शाहूवाडी) येथे कोरोना रुग्णांच्या संपर्कातील नागरिकांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग अंतर्गत आरोग्य विभागाच्यावतीने स्वॅब तपासणी सुरू केली आहे. या मोहिमेस प्रतिसाद मिळत नसल्याने तहसीलदार गुरू बिराजदार यांनी स्वत: या गावास भेट देऊन घरोघरी जाऊन नागरिकांमध्ये प्रबोधन करत स्वॅब देण्यासाठी आवाहन केले. त्यांच्या या आवाहनानंतर गावातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील २७ नागरिकांनी स्वॅब दिले.
या वेळी पोलीस निरीक्षक विजय पाटील, सहाय्यक गटविकास अधिकारी विजय कोटकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एच. आर. निरंकारी, सरपंच संदीप पाटील, उपसरपंच प्रकाश पाटील, सदस्य आनंद पाटील, ग्रामसेवक जे. एल. गिरीगोसावी, सुंदर पाटील, उत्तम मगदूम, मच्छिंद्र मगदूम, दिगंबर राबाडे, बाबूराव बढे, पांडुरंग कांबळे आदी उपस्थित होते.
फोटो :
ओळी : साळशीपैकी पोवारवाडी येथे घरोघरी भेट देत स्वॅब तपासणीसाठी आवाहन करताना तहसीलदार गुरू बिराजदार.