चला, निवडूया अचूक करिअर
By Admin | Updated: June 12, 2015 00:45 IST2015-06-12T00:05:28+5:302015-06-12T00:45:45+5:30
तज्ज्ञांचे मार्गदर्शन : ‘लोकमत अॅस्पायर एज्युकेशन फेअर’चे आयोजन

चला, निवडूया अचूक करिअर
कोल्हापूर : करिअरविषयक अनेक प्रश्नांसाठी अचूक उत्तर असलेले ‘लोकमत अॅस्पायर एज्युकेशन फेअर’ हे शैक्षणिक प्रदर्शन शनिवार (दि. १३) ते सोमवार (दि. १५) दरम्यान कोल्हापूरमध्ये होणार आहे. प्रदर्शनात नामांकित शैक्षणिक संस्थांची इत्थंभूत माहिती ‘एकाच छताखाली’ उपलब्ध होणार आहे.
‘लोकमत’ समूहाने ‘अॅस्पायर एज्युकेशन फेअर’ हे शैक्षणिक प्रदर्शन आयोजित केले आहे. कोल्हापूरमधील राजारामपुरीतील डॉ. व्ही. टी. पाटील स्मृतिभवनात हे प्रदर्शन होईल. पालक आणि विद्यार्थी यांच्या मनात करिअरसाठीच्या, शिक्षणाविषयीच्या अनेक शंका, प्रश्न असतात. त्यांचे निराकरण आणि प्रश्नांना अचूक उत्तरे या प्रदर्शनात मिळतील. शैक्षणिक क्षेत्रातील तज्ज्ञ यावेळी मार्गदर्शन करणार आहेत. एकाच ठिकाणी शैक्षणिक माहितीचा खजिना उपलब्ध होणार असल्याने पालक आणि विद्यार्थ्यांचा श्रम, वेळ आणि पैसा वाचणार आहे.
या प्रदर्शनामध्ये राज्यातील मेडिकल, इंजिनिअरिंग, आर्किटेक्चरपासून फॅशन, ग्राफिक्स, इंटिरिअर डिझाईनपर्यंत व रिटेल, आयटीआय, एव्हिएशनपासून मीडिया, अॅनिमेशन, गेमिंगपर्यंत तसेच विविध विद्यापीठे, प्रोफेशनल क्लासेस, आयटीआय, हॉटेल मॅनेजमेंट, फॉरिन लँग्वेजेस, पॉलिटेक्निकल, स्पोकन इंग्लिश, लॉ कॉलेज, हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट, कॅपिटल मार्केट आदी विविध क्षेत्रांतील नामांकित शैक्षणिक संस्था तसेच महाविद्यालये सहभागी होणार
आहेत. (प्रतिनिधी)
मिळणार ‘करिअर बुक’
या प्रदर्शनाला भेट देणाऱ्या प्रत्येक विद्यार्थी, विद्यार्थिनीला ‘लोकमत’तर्फे ‘करिअर बुक’ मोफत देण्यात येणार आहे. शिवाय प्रत्येक तासाला
लकी ड्रॉ काढण्यात येणार असून, यातील विजेत्यांना आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत.