शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

OBC Reservation  : छगन भुजबळ, फडणवीसांशी खुल्या चर्चेला तुम्ही बिंदू चौकात या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 12:52 IST

Bjp OBC Reservation Kolhapur : छगन भुजबळ यांनी पुड्या न सोडता ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर देवेंद्र फडणवीस यांच्याशी खुली चर्चा करण्यासाठी कोल्हापूरच्या बिंदू चौकात यावे असे जाहीर आव्हान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिले.

ठळक मुद्देभुजबळ, फडणवीसांशी खुल्या चर्चेला बिंदू चौकात या चंद्रकांत पाटील यांचे ओबीसी आरक्षणाबाबत आव्हान

कोल्हापूर  : छगन भुजबळ यांनी पुड्या न सोडता ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर देवेंद्र फडणवीस यांच्याशी खुली चर्चा करण्यासाठी कोल्हापूरच्या बिंदू चौकात यावे असे जाहीर आव्हान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिले.ओबीसीचे राजकीय आरक्षण रद्द झाल्याच्या निषेर्धात भाजपच्या ओबीसी मोर्चाच्यावतीने येथील दाभोळकर कॉनर्रला चक्का जाम करण्यात आला. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना पाटील यांनी हे आव्हान दिले.पाटील म्हणाले, ५० टक्क्यावर आरक्षण गेल्यानंतरही फडणवीस सरकारने हे आरक्षण टिकवलं होतं. त्यानंतर आमचं सरकार गेलं. सर्वोच्च न्यायालयानं १५ वेळा सांगूनही डाटा उपलब्ध करून दिला नाही. प्रत्येक वेळी तारीख मागत राहिलात. तुम्ही त्याचं कायद्यात रूपांतर केलं नाही. मराठा समाजाचा घात तुम्ही केलात, ओबीसी समाजाचा घात तुम्ही केलात. तेव्हा बिंदू चौकात या. नेमकी कुणी फसवणूक केली ते कळूद्या.माजी खासदार धनंजय महाडिक म्हणाले, ओबीसी समाजाने आता कॉंग्रेसला जाब विचारला पाहिजे. कारण ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्याविरोधात का कॉग्रेसच्या आमदाराच्या मुलाने आणि एका कॉंग्रेसच्या जिल्हा परिषद अध्यक्षाने याचिका दाखल केली होती. म्हणून हा घोळ झाला.

यावेळी सुमारे तासभर या ठिकाणी चक्का जाम आंदोलन करत घोषणाबाजी करण्यात आली. अखेर पाटील यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेवून सोडून देण्यात आले. माजी आमदार अमल महाडिक, राहूल चिकोडे, सत्यजित कदम, विजय जाधव, विजय सुर्यवंशी, सुनील कदम यांच्यासह पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

टॅग्स :OBC Reservationओबीसी आरक्षणBJPभाजपाkolhapurकोल्हापूरchandrakant patilचंद्रकांत पाटीलChagan Bhujbalछगन भुजबळ