शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

चिथावणीखोर वक्तव्य करणाऱ्या वारीस पठाण यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2020 15:18 IST

कोल्हापूर : गुलबर्गा (कर्नाटक) येथील कार्यक्रमात चिथावणीखोर वक्तव्य करून हिंदू-मुस्लिमांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या ‘एमआयएम’चे नेते वारीस पठाण यांच्या ...

ठळक मुद्देचिथावणीखोर वक्तव्य करणाऱ्या वारीस पठाण यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन शिवाजी तरुण मंडळातर्फे निषेध : देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

कोल्हापूर : गुलबर्गा (कर्नाटक) येथील कार्यक्रमात चिथावणीखोर वक्तव्य करून हिंदू-मुस्लिमांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या ‘एमआयएम’चे नेते वारीस पठाण यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे शिवाजी तरुण मंडळातर्फे दहन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी वारीस पठाण यांचा निषेध करत देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.वारीस पठाण यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी शिवाजी तरुण मंडळाचे कार्यकर्ते सायंकाळी शिवाजी पेठेतील निवृत्ती चौकात जमा झाले. या ठिकाणी वारीस पठाण यांच्या वक्तव्याचा निषेध करत त्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. यावेळी वारीस पठाण मुर्दाबाद...च्या घोषणा देत आंदोलकांनी परिसर दणाणून सोडला.गुलबर्गा येथील कार्यक्रमात वारीस पठाण यांनी चिथावणीखोर वक्तव्य केले. त्यावेळी व्यासपीठावर त्यांचे नेते खासदार ओवैसीही होते. अशा प्रकारचे वक्तव्य करून आव्हान देण्याचे काम ही प्रवृत्ती करीत आहे. तरी अशा प्रवृत्तींना गाडण्याकरीता केंद्र सरकारने त्यांच्यावर तातडीने देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अन्यथा ‘एमआयएम’च्या कार्यकर्त्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही, असा इशारा अध्यक्ष सुजित चव्हाण, सचिव महेश जाधव आदींनी यावेळी दिला.नागरिकत्व दुरुस्ती कायदा हा चांगला असून, त्याला नाहक विरोध करणे चूक असून त्याला सर्वांनी पाठिंबा द्यावा, असे आवाहन जाधव यांनी यावेळी केले. आंदोलनात मंडळाचे उपाध्यक्ष अजित राऊत, रविकिरण इंगवले, सुरेश जरग, सदाभाऊ शिर्के, लाला गायकवाड, अजित खराडे, अक्षय मोरे, राजू चव्हाण, शिवाजी जाधव, श्रीकांत भोसले, रोहित मोरे, निखिल कोराणे, विशाल बोंगाळे, प्रसाद इंगवले, सुनील राऊत, अभिजित कडोलकर, राजू जाधव, अभिजित राऊत, मंदार पाटील, प्रताप देसाई, आकाश सरनाईक, सदाशिव जाधव, आदी सहभागी झाले होते. 

 

टॅग्स :Waris Pathanवारिस पठाणkolhapurकोल्हापूर