हातकणंगले २० गावात रंगतदार लढती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:18 IST2021-01-08T05:18:16+5:302021-01-08T05:18:16+5:30

कबनूर ग्रामपंचायतीच्या १७ जागांसाठी ६९ उमेदवार रिंगणात असून येथे चौरंगी लढत होत आहे. आवाडे गटाची ताराराणी, सर्वपक्षीय महाविकास आघाडी, ...

Colorful fights in 20 villages of Hatkanangle | हातकणंगले २० गावात रंगतदार लढती

हातकणंगले २० गावात रंगतदार लढती

कबनूर ग्रामपंचायतीच्या १७ जागांसाठी ६९ उमेदवार रिंगणात असून येथे चौरंगी लढत होत आहे. आवाडे गटाची ताराराणी, सर्वपक्षीय महाविकास आघाडी, भाजपा आणि पी. एम. पाटील यांची स्वतंत्र आघाडी, तर युवकाची युवा क्रांती आघाडी अशी लढत होत आहे. चंदूर, रुई, माणगांव, तिळवणी, जंगमवाडी या गावांमध्येही आवाडे यांच्या आघाडीविरुद्ध स्थानिक आघाडी अशा लढती होत आहेत, तर कुंभोज, पाडळी, मनपाडळे, वाठार तर्फ वडगांव, लाटवडे, खोची, वाठार तर्फ उदगांव, या वारणापट्टयातील गावामध्ये स्थानिक आघाडयांमध्ये लढती होत आहेत. गावपातळीवरील नेते विधानसभा, लोकसभा निवडणुका विसरून एकमेकांच्या गळ्यात गळे घालून स्थानिक राजकारण जुळवून पॅनल तयार करून लढत आहेत. मिणचे गावामध्ये जि.प. शिक्षण सभापती शिवसेनेचे प्रवीण यादव यांच्या आघाडीविरुद्ध सर्वपक्षीय आघाडी अशी लढत होत आहे, तर माणगाववाडी, बिरदेववाडी, दुर्गेवाडी, हालोंडी या गावांमध्ये दोन -चार जागा बिनविरोध होऊनही या लहान गावांमध्ये प्रतिष्ठेसाठी लढती होत आहेत.

Web Title: Colorful fights in 20 villages of Hatkanangle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.