बालकांच्या निरागस हास्याची रंगली मैफल

By Admin | Updated: July 16, 2015 00:57 IST2015-07-16T00:57:24+5:302015-07-16T00:57:24+5:30

‘जॉन्सन्स’ प्रस्तुत ‘लोकमत सुदृढ बालक स्पर्धा’ : ४०० बालकांचा उत्स्फूर्त सहभाग; बालकांच्या संगोपनाविषयी तज्ज्ञांकडून मार्गदर्शन

The colorful concert of the innocent laugh of the children | बालकांच्या निरागस हास्याची रंगली मैफल

बालकांच्या निरागस हास्याची रंगली मैफल

कोल्हापूर : विविध रंगांच्या पोशाखात नटून-थटून आलेली बालके, लाडक्या ‘पिल्ल्या’सोबत पालकांनी फोटोसाठी दिलेली पोझ आणि त्यांच्या पाल्याने दिलेले निरागस, अवखळ स्माईल, अशा विविध, आनंददायक
क्षणांमुळे स्वर्गातील नंदनवनाचा भास होत होता. निमित्त होते... जॉन्सन्स बेबी प्रायोजित ‘लोकमत’ सुदृढ बालक स्पर्धेचे!
कोल्हापुरातील मधुसूदन हॉलमध्ये मंगळवारी दुपारी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन आयएपी, कोल्हापूरच्या अध्यक्षा डॉ. छाया पुरोहित यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी ‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले, ‘आयएपी’च्या सचिव डॉ. दीपा फिरके, डॉ. राहुल शिंदे, डॉ. राजेश औंधकर, जॉन्सन्सचे साउथ महाराष्ट्र व गोव्याचे रिजनल मॅनेजर ज्ञानेश्वर थोरबोले यांची प्रमुख उपस्थिती होती. एकूण तीन गटांतील ही स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली. स्पर्धा दुपारी दोन वाजता जरी सुरू होणार असली तरी पालकांची दुपारी एक वाजल्यापासूनच गर्दी होत होती. या स्पर्धेमध्ये एकूण ४०० बालकांचा सहभाग होता.
हॉलच्या परिसरात रंगीबेरंगी फुगे, डोरेमॉम व छोटा भीमची वेशभूषा परिधान केलेले गंमतवीर बालकांचे स्वागत करीत, आपल्या हावभावांनी त्यांच्या चेहऱ्यावर अनोखे हास्य फुलवीत होते. या ठिकाणी प्रथम बालकांच्या वजन व उंचीची नोंद घेऊन, बालकांसोबत पालकांचा विशेष फोटो काढण्याचे खास नियोजन ‘लोकमत’च्या वतीने करण्यात आले होते. अनेकजण आपल्या लाडक्या ‘पिल्ल्या’सोबत येथे फोटो काढून घेत होते. यासह मुलांना खेळण्यासाठी हॉलबाहेर रिमोट गाडीचे विशेष नियोजन करण्यात आले होते. या ठिकाणी लहान मुलांसह त्यांचे पालकही दंगामस्ती करण्यात रमले होते. गुटगुटीत, निरोगी बालकांचे कौतुक आणि त्यांच्या आरोग्याविषयी जागृती वाढविण्यासाठी आयोजित या स्पर्धेत पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुखदा आठल्ये यांनी केले. प्रत्येक बालकासाठी ‘जॉन्सन्स बेबी’तर्फे हेल्थ किट देण्यात
आले. डॉक्टरांनी उपस्थित मातांना शिशूच्या आरोग्यविषयी मोलाचे मार्गदर्शन केले. लहान मुलांची त्वचा ही प्रौढ व्यक्तीच्या त्वचेपेक्षा खूप वेगळी असते. त्यामुळे त्यांच्या नाजूक त्वचेची काळजी घेण्यासाठी खास पद्धतीने तयार केलेली सुरक्षित, सौम्य आणि परिणामकारक अशीच उत्पादने वापरण्याचा सल्ला डॉक्टरांनी यावेळी दिला.
या स्पर्धेचे परीक्षक म्हणून
डॉ. छाया पुरोहित, डॉ. दीपा फिरके, डॉ. पी. जी. पाटील, डॉ. राहुल शिंदे, डॉ. अमोल गिरवालकर,
डॉ. साईनाथ पोवार, डॉ. विजय गावडे, डॉ. शिरीष मिरगुडे, डॉ. संतोष निंबाळकर, डॉ. निवेदिता पाटील,
डॉ. राजेश औंधकर, डॉ. विमला रानडे, डॉ. ऋषिका यादव, डॉ. नितीन काशेकर, डॉ. सुधीर सरवडे यांनी काम पाहिले. यासाठी सावित्रीबाई फुले स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कॉलेज आॅफ नर्सिंगमधील विद्यार्थ्यांचे विशेष सहकार्य लाभले.
यावेळी ‘जॉन्सन्स’तर्फे ‘बाळाची निगा’ याविषयी मार्गदर्शन
करण्यात आले. बाळाच्या आरोग्याला साजेशी अशी शुद्ध, सौम्य, संवेदनशील आणि वैद्यकीय परीक्षणांतून सिद्ध झालेली उत्पादने निर्माण करण्याची उज्ज्वल परंपरा ‘जॉन्सन्स बेबी’ला लाभलेली आहे. कंपनीची सर्व उत्पादने गुणवत्तेच्या बाबतीत कुठलीही तडजोड न करता
कठोर वैद्यकीय चाचण्यांतून मंजूर केली जातात; म्हणून गेल्या शंभर वर्षांपासून लहान मुलांची काळजी घेण्याबाबत एक विश्वासू नाव म्हणून ‘जॉन्सन्स बेबी’ची ओळख टिकून आहे. सुरक्षित, सौम्य आणि परिणामकारक अशा तिहेरी लाभयुक्त उत्पादनांद्वारे ग्राहकांना नेहमी
दर्जेदार आणि नावीन्यपूर्ण सेवा पुरविण्यासाठी कंपनी नेहमीच तत्पर राहिली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The colorful concert of the innocent laugh of the children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.