म्हाकवेत तिरंगी लढतीने निवडणुकीत रंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:19 IST2021-01-08T05:19:04+5:302021-01-08T05:19:04+5:30

म्हाकवे : म्हाकवे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी तिरंगी लढत निश्चित झाली आहे. राष्ट्रवादी काॅंग्रेसचे तालुकाध्यक्ष शिवानंद माळी यांनी सवता सुभा कायम ...

Color in the election with a triangular fight in Mhakavet | म्हाकवेत तिरंगी लढतीने निवडणुकीत रंग

म्हाकवेत तिरंगी लढतीने निवडणुकीत रंग

म्हाकवे : म्हाकवे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी तिरंगी लढत निश्चित झाली आहे. राष्ट्रवादी काॅंग्रेसचे तालुकाध्यक्ष शिवानंद माळी यांनी सवता सुभा कायम ठेवत काही नाराजांना एकत्रित करीत तिसरी आघाडी केली आहे. तर मंडलिक-मुश्रीफ गटाची युती झाली असून दोन्ही घाटगे गट एक झाले आहेत. त्यामुळे माळी यांच्या आघाडीचा फटका कोणाला बसणार याबाबत चर्चेला उधाण आले आहे.

१३ जागांसाठी ४३ जण रिंगणात उतरले आहेत.

कागल तालुक्यातील राजकीयदृष्ट्या अतिसंवेदनशील म्हणून ओळख असणाऱ्या म्हाकवे येथील निवडणुका या नेहमीच इर्षेने होतात.

सदासाखरचे उपाध्यक्ष बंडोपंत चौगुले व मुश्रीफ गटाचे रमेश पाटील यांची तर संजय घाटगे गटाचे माजी पंचायत समिती सदस्य ए. वाय. पाटील व राजे गटाचे माजी उपसरपंच धनंजय पाटील यांची आघाडी झाली आहे. सध्या गावात भेटीगाठी घेत प्रचाराला वेग आला आहे. दरम्यान, राजे गटातील ए. डी. पाटील गटाने उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. त्या गटाचा लाभ धनंजय पाटील-ए. वाय. पाटील यांच्या युतीला होणार आहे.

चिन्हे आणि प्रचार

शिट्टी हे चिन्ह मिळालेले सदाशिव पाटील हे शिट्टी वाजवत प्रचार करीत आहेत. वीस वर्षांपासून शिलाई काम करणाऱ्या शीतल चौगुले यांना शिलाई मशिन मिळाले आहे. पंढरी पाटील संगणकाचा माऊस गळ्यात अडकवून फिरत आहेत. तर रोडरोलर चिन्ह मिळालेले प्रवीण हे रोडरोलर चालवणारा व्हीडीओ व्हायरल करीत प्रचारात रंगत आणत आहेत.

सदस्य-१३, प्रभाग-५, मतदार संख्या - ४२०२

Web Title: Color in the election with a triangular fight in Mhakavet