शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

रंग, डिझाइन ठरेना.. १०० ई-बसेस धावेनात?; कोल्हापूरकरांना दीडवर्षे नुसतीच प्रतिक्षा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2025 16:23 IST

सप्टेंबरअखेर पायाभूत सुविधा होणार

कोल्हापूर : बुद्धगार्डन येथील ‘केएमटी’च्या कार्यशाळेत ई-बसेसच्या अनुषंगाने पायाभूत सुविधा निर्माण करण्याची कामे गतीने सुरू असून जवळपास सत्तर टक्के कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित कामेही सप्टेंबरअखेर पूर्ण केली जाणार आहेत; परंतु ई-बसेसचे डिझाइन, रंग कोणता असावा यावरच अद्याप निर्णय झाला नसल्याने या बसेस केव्हा येणार याबाबत सगळेच अनभिज्ञ आहेत.महानगरपालिकेच्या परिवहन विभागाला (केएमटी) भाडेतत्त्वावर १०० ई-बसेस केंद्र सरकारकडून दिल्या जाणार आहेत. याबाबतचा निर्णय होऊन दीड वर्ष होऊन गेले. या ई-बसेससाठी लागणारे चार्जिंग स्टेशन आणि अद्ययावत डेपोसह पायाभूत सुविधा देण्याकरिता केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून जवळपास ३४ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून चार्जिंग स्टेशन व डेपोची कामे सुरू करण्यात आली आहेत.बुद्धगार्डन येथील कार्यशाळेच्या प्रशस्त जागेवर पायाभूत सुविधा निर्माण करण्याची कामे अत्यंत गतीने सुरू झाली आहेत. डेपो अद्यावतीकरण करण्याची कामे महापालिकेतर्फे, तर चार्जिंग स्टेशनसाठी एच.टी. व एल.टी. लाइन टाकणे, पॅनेल, ट्रान्स्फॉर्मर बसविणे ही कामे महावितरण विभागाकडून केली जात आहेत. डेपोच्या इमारतीचे काम पूर्ण होऊन त्यावर स्लॅब टाकला आहे. तेथील सिव्हिलची सर्व कामे सप्टेंबरअखेर पूर्ण केली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.एच.टी. लाइन टाकण्याचे केवळ साडेपाचशे मीटरचे काम राहिले आहे. गोकुळ शिरगाव येथे म्हसोबा मंदिरजवळ या कामात तांत्रिक अडचण आल्यामुळे थांबले आहे. सेवारस्त्यावरून ही लाइन ओढून घ्यावी, असे महापालिका प्रशासनाचे म्हणणे आहे. एल.टी. लाइनचे दोन ट्रान्स्फॉर्मर बसले आहेत. या कामाची मुदत संपल्यानंतर जादा दोन महिन्यांची वाढीव मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे एच.टी. व एल.टी. लाइनचे काम सप्टेंबरअखेर पूर्ण होईल, असे सांगण्यात आले.

निवडणुकीनंतरच शक्यताइलेक्ट्रिक लाइन ओढून घेण्याबरोबरच डेपोचे काम सप्टेंबरअखेर किंवा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत जरी पूर्ण होत असले तर ज्यांच्यासाठी ही कामे हाती घेतली आहेत, त्या ई-बसेस केव्हा येणार याची उत्सुकता आहे. महापालिकेची निवडणूक झाल्यानंतरच ई-बसेस कोल्हापुरात धावतील, अशी अपेक्षा आहे.

१७ कोटींपैकी आले ३.३० कोटीअद्यावत डेपो आणि पायाभूत सुविधांकरिता केंद्र व राज्य सरकारने १७ कोटी १८ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यातून आतापर्यंत ७० टक्के कामे पूर्ण झाली आहेत. मात्र, मंजूर निधीपैकी केवळ ३ कोटी ३० लाख रुपयेच प्राप्त झाले आहेत.