शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

महाविद्यालयीन तरुणीची आत्महत्या : कारण अस्पष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2019 15:59 IST

महाविद्यालयीन तरुणीने राहत्या घरी तुळईस ओढणीने गळफास घेवून आत्महत्या केल्याचे शनिवारी सकाळी उघडकीस आले. मुबीना जँहागीर आंबी (वय २०, रा. फुलेवाडी पहिला बसस्टॉप, कोल्हापूर) असे तिचे नाव आहे. आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे. घटनास्थळी व सीपीआरमध्ये करवीरचे पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांनी भेट देवून पाहणी केली.

ठळक मुद्देमहाविद्यालयीन तरुणीची आत्महत्या कारण अस्पष्ट

कोल्हापूर : महाविद्यालयीन तरुणीने राहत्या घरी तुळईस ओढणीने गळफास घेवून आत्महत्या केल्याचे शनिवारी सकाळी उघडकीस आले. मुबीना जँहागीर आंबी (वय २०, रा. फुलेवाडी पहिला बसस्टॉप, कोल्हापूर) असे तिचे नाव आहे. आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे. घटनास्थळी व सीपीआरमध्ये करवीरचे पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांनी भेट देवून पाहणी केली.पोलीसांनी सांगितले, मुबीना अंबीच्या वडीलांचे वर्षापूर्वी छत्र हरवले. ती घरी आई आणि आजी यांचेसोबत राहत होती. घरची जबाबदारी तिच्यावर होती. शहरातील दसरा चौकातील एका महाविद्यालयात ती वाणीज्य शाखेच्या दूसऱ्या वर्षात शिकत होती. शिक्षण घेत नोकरी करीत होती. आई हॉटेलमध्ये धुण्याभांड्याची कामे करते. आजी खासगी रुग्णालयात काम करते.

नेहमीप्रमाणे शनिवारी सकाळी तिची आई कामावर गेली. ती घरी एकटीच होती. आजी खुदेजाबी इब्राहीम आंबी या रात्रड्युटी करुन घरी आल्या. दरवाजा उघडून पाहतात तर मुबीनाने गळफास घेतल्याचे दिसून आले. त्यांनी आरडाओरड करताच शेजारील लोक धावत आले.

बेशुध्दावस्थेत त्यांनी तिला सीपीआरमध्ये दाखल केले असता उपचारापूर्वी मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तिच्या मृत्यूने आई व आजी पोरकी झाली. त्यांचा आक्रोश पाहून अनेकांना गहिवरुन आले. मुबीनाने कोणत्या कारणासाठी आत्महत्या केली हे स्पष्ट होवू शकले नाही. याबाबत जुना राजवाडा पोलीस ठाण्यात नोंद झाली.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर