महाविद्यालयीन काळ अविस्मरणीय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:54 IST2020-12-05T04:54:29+5:302020-12-05T04:54:29+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : महाविद्यालयीन काळ हा अविस्मरणीय असतो. करिअर घडविण्याचे स्वप्न उराशी बाळगून जीवनात यशस्वी ठरलेल्या ...

The college days were unforgettable | महाविद्यालयीन काळ अविस्मरणीय

महाविद्यालयीन काळ अविस्मरणीय

लोकमत न्यूज नेटवर्क

इचलकरंजी : महाविद्यालयीन काळ हा अविस्मरणीय असतो. करिअर घडविण्याचे स्वप्न उराशी बाळगून जीवनात यशस्वी ठरलेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनींचा आम्हा गुरूजनांचा अभिमान वाटतो, असे गौरवोद्गार प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार यांनी काढले.

येथील डीकेएएससी कॉलेजमध्ये १९९४-१९९८ वर्षातील माजी विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या स्नेहमेळाव्यात ते बोलत होते.

सुरुवातीला स्वामी विवेकानंद व बापूजी साळुंखे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमात माजी विद्यार्थी-विद्यार्थिनींनी मनोगत व्यक्त केले. अमर नवाळे यांनी स्वागत व बसवराज कोटगी यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमास पराग सुर्वे, महावीर टारे, असिफ कोतवाल, सर्जेराव पडीयार, गीता पुजारी, सुनीता भगाचे यांच्यासह माजी विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. सूत्रसंचालन यासीन चौगुले यांनी केले. अजय व्हनुगरे यांनी आभार मानले.

Web Title: The college days were unforgettable

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.