शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेने कॉलेज कॅम्पस फुलला, विद्यार्थ्यांमध्ये उत्साह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 18:37 IST

coronavirusunlock, college, admisson, kolhapurnews कोरोना आणि एसईबीसी आरक्षणाच्या स्थगितीमुळे लांबणीवर पडलेली शहरातील अकरावीची प्रत्यक्ष प्रवेशाची प्रक्रिया गुरुवारपासून पूर्ववत सुरू झाली. प्रवेशासाठी विद्यार्थी आणि पालकांनी उपस्थिती लावल्याने विविध कॉलेज कॅम्पस गर्दीने फुलले. विद्यार्थ्यांमध्ये उत्साह दिसून आला.

ठळक मुद्देअकरावीच्या प्रवेश प्रक्रियेने कॉलेज कॅम्पस फुलला, विद्यार्थ्यांमध्ये उत्साहकोरोनाबाबतची दक्षता घेऊन प्रक्रिया : पहिल्या फेरीतील प्रवेशासाठी मंगळवारपर्यंत मुदत

कोल्हापूर : कोरोना आणि एसईबीसी आरक्षणाच्या स्थगितीमुळे लांबणीवर पडलेली शहरातील अकरावीची प्रत्यक्ष प्रवेशाची प्रक्रिया गुरुवारपासून पूर्ववत सुरू झाली. प्रवेशासाठी विद्यार्थी आणि पालकांनी उपस्थिती लावल्याने विविध कॉलेज कॅम्पस गर्दीने फुलले. विद्यार्थ्यांमध्ये उत्साह दिसून आला.केंद्रीय प्रवेश प्रक्रिया समितीने शहरातील विविध ३४ कनिष्ठ महाविद्यालयांतील अकरावी प्रवेशाच्या पहिल्या फेरीची निवड (गुणवत्ता) यादी बुधवारी (दि. २)जाहीर केली. प्रवेश मिळालेल्या महाविद्यालयांची माहिती या समितीने विद्यार्थ्यांना एसएमएसद्वारे कळविली.

प्रत्यक्ष प्रवेशाची प्रक्रिया राबविण्यासाठी महाविद्यालयांना सूचना केली. त्यानुसार गुरुवारी सकाळी दहा वाजल्यापासून महाविद्यालयांमध्ये प्रवेशाची प्रक्रिया सुरू झाली. शहाजी कॉलेज, महावीर महाविद्यालय, विवेकानंद कॉलेज, राजर्षी छत्रपती शाहू कॉलेज, न्यू कॉलेज, गोखले कॉलेज, कमला कॉलेज, राजाराम महाविद्यालय, डीआरके कॉमर्स कॉलेज, आदी महाविद्यालयांमध्ये कोरोनाबाबतची दक्षता घेऊन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली.

 

टॅग्स :Coronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉकcollegeमहाविद्यालयEducation Sectorशिक्षण क्षेत्रStudentविद्यार्थीkolhapurकोल्हापूर