‘कॉलेज कॅम्पस’ फुलला, बहरला...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:24 IST2021-02-16T04:24:15+5:302021-02-16T04:24:15+5:30
दोन दिवसात आढावा घेणार शिवाजी विद्यापीठाने केलेल्या सूचनांनुसार विविध अधिविभाग आणि संलग्नित महाविद्यालयांमधील पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे वर्ग भरले आहेत. ...

‘कॉलेज कॅम्पस’ फुलला, बहरला...
दोन दिवसात आढावा घेणार
शिवाजी विद्यापीठाने केलेल्या सूचनांनुसार विविध अधिविभाग आणि संलग्नित महाविद्यालयांमधील पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे वर्ग भरले आहेत. त्यातील विद्यार्थ्यांच्या उपस्थितीचे प्रमाण, वर्ग भरविण्यासह वसतिगृह सुरू करण्याबाबत काही अडचणी असल्यास त्याबाबतचा आढावा विद्यापीठाकडून दोन दिवसांमध्ये घेतला जाणार असल्याचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी सांगितले.
प्रतिक्रिया
कॉलेजमध्ये येण्याबाबत विद्यार्थ्यांमध्ये उत्साह असल्याने पहिल्या दिवशी त्यांची ५० टक्क्यांहून अधिक उपस्थिती होती. थर्मल गनने तपासणी करून आणि मास्क असेल तरच विद्यार्थ्यांना कॅम्पसमध्ये प्रवेश देण्यात आला. उद्यापासून एक दिवसआड ५० टक्के विद्यार्थ्यांना वर्गात बोलविण्यात येणार आहे.
- डॉ. राजेंद्र लोखंडे, प्राचार्य, महावीर महाविद्यालय
पहिला दिवस कसा गेला
बी. एस्सी. अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षामध्ये मी शिकत आहे. कॉलेजमध्ये आल्यानंतर खूप छान वाटले. पाचव्या आणि सहाव्या सत्राची परीक्षा घेताना त्यामध्ये योग्य वेळ विद्यापीठाने द्यावा.
- अमीन फरास, फुलेवाडी.
कॉलेजमधील पहिला दिवस मजेत गेला. आम्ही सर्वांनी मास्क, सोशल डिस्टन्सिंग, आदी नियमांचे पालन केले. ऑनलाईन शिक्षणात बऱ्यापैकी अभ्यासक्रम पूर्ण झाला आहे. वर्ग सुरू झाल्याने आता प्रॅक्टिकल करता येतील.
- सुनिती चौगुले, कसबा बावडा.
बारावीनंतर प्रथम वर्षात चार महिन्यांपूर्वी प्रवेश घेतला. त्यामुळे वर्ग कधी सुरू होतील, याची प्रतीक्षा लागली होती. वर्ग भरल्याने खूप मस्त वाटले. ऑनलाईनपेक्षा प्रत्यक्षात शिक्षण घेण्याचा आनंद वेगळाच आहे.
- राकेश शिंदे, पन्हाळा.
आकडेवारी दृष्टिक्षेपात
तालुकानिहाय महाविद्यालये
आजरा : २
भुदरगड : ३
चंदगड : ५
गडहिंग्लज : १२
गगनबावडा : २
हातकणंगले : २५
कागल : ८
करवीर : ३७
पन्हाळा : १२
राधानगरी : ३
शाहूवाडी : ४
शिरोळ : ८
एकूण : १२१
एकूण विद्यार्थी संख्या : १,०९,४२४
पहिल्या दिवशीची उपस्थिती : सरासरी ५० टक्के
फोटो (१५०२२०२१-कोल-डीआरके कॉलेज ०१, ०२) : कोल्हापुरात सोमवारी तब्बल अकरा महिन्यानंतर पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे वर्ग भरले. त्यामुळे शहरातील डीआरके कॉमर्स कॉलेज परिसर विद्यार्थ्यांच्या गर्दीने फुलला होता. (छाया : नसीर अत्तार)
फोटो (१५०२२०२१-कोल-डीआरके कॉलेज ०३) : कोल्हापुरात सोमवारी तब्बल अकरा महिन्यानंतर पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे वर्ग भरले. त्याचा आनंद शहरातील डीआरके कॉमर्स कॉलेजच्या विद्यार्थिनींनी असा सेल्फी घेत व्यक्त केला. (छाया : नसीर अत्तार)
फोटो (१५०२२०२१-कोल-महावीर कॉलेज ०१) : कोल्हापुरात सोमवारी तब्बल अकरा महिन्यानंतर पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे वर्ग भरले. शहरातील महावीर महाविद्यालयाच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांच्या गप्पा रंगल्या होत्या. (छाया : नसीर अत्तार)
फोटो (१५०२२०२१-कोल-महावीर कॉलेज ०२) : कोल्हापुरात सोमवारी महावीर महाविद्यालयातील पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे वर्ग भरले. परीक्षा अर्जांचे शुल्क भरण्यासाठी महाविद्यालयाच्या कार्यालयाबाहेर विद्यार्थ्यांची रांग लागली होती. (छाया : नसीर अत्तार)
फोटो (१५०२२०२१-कोल-शहाजी कॉलेज) : कोल्हापुरात सोमवारी तब्बल अकरा महिन्यानंतर पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे वर्ग भरले. शहरातील श्री शहाजी महाविद्यालयाच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांच्या गप्पा रंगल्या. (छाया : नसीर अत्तार)
फोटो (१५०२२०२१-कोल-व्हीसीके कॉलेज ०१, ०४, ०५, ०६, ०७) : कोल्हापुरात सोमवारी तब्बल अकरा महिन्यानंतर पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे वर्ग भरले. त्यामुळे शहरातील विवेकानंद कॉलेजचा परिसर विद्यार्थ्यांच्या गर्दीने फुलला होता. (छाया : नसीर अत्तार)
फोटो (१५०२२०२१-कोल-व्हीसीके कॉलेज ०२ व ०३) : कोल्हापुरात सोमवारी तब्बल अकरा महिन्यानंतर पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे वर्ग भरले. शहरातील विवेकानंद कॉलेजमध्ये थर्मल गनने तपासणी करून विद्यार्थिनींना कॅम्पसमध्ये प्रवेश देण्यात आला. (छाया : नसीर अत्तार)
सिंगल फोटो (१५०२२०२१-कोल-अमीन फरास (कॉलेज), सुनिती चौगुले (कॉलेज), राकेश शिंदे (कॉलेज)