शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकारी कार्यालय पुन्हा गजबजले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2021 14:46 IST

collector Office Flood Kolhapur : महापुरामुळे गेली दहा दिवस बंद असलेले जिल्हाधिकारी कर्यालय सोमवारी पुन्हा गजबजले. पुराच्या पाण्यात बुडालेल्या जुन्या इमारतीतील कर्मचारी दप्तर लावण्यात व्यस्त होते. विद्युत पुरवठा सुरळीत झाल्याने अन्य विभागातील महसूलचे कामकाज पूर्ववत सुरू झाले. जिल्हाधिकाऱ्यांसह सर्व कर्मचाऱ्यांनी आपआपल्या दालनातून कामकाजाला सुरुवात केली.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी कार्यालय पुन्हा गजबजलेदहा दिवसांनी कामकाज सुरू : कर्मचारी दप्तर लावण्यात व्यस्त

कोल्हापूर : महापुरामुळे गेली दहा दिवस बंद असलेले जिल्हाधिकारी कर्यालय सोमवारी पुन्हा गजबजले. पुराच्या पाण्यात बुडालेल्या जुन्या इमारतीतील कर्मचारी दप्तर लावण्यात व्यस्त होते. विद्युत पुरवठा सुरळीत झाल्याने अन्य विभागातील महसूलचे कामकाज पूर्ववत सुरू झाले. जिल्हाधिकाऱ्यांसह सर्व कर्मचाऱ्यांनी आपआपल्या दालनातून कामकाजाला सुरुवात केली.जिल्ह्यात २१ ते २४ जुलैदरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्हाधिकारी कार्यालयाची इमारतदेखील महापुराने वेढली होती. निवासी उपजिल्हाधिकारी यांचे दालन आणि जमीन, गृह, गावठाण, नागपूर ऑडिट हे जुन्या इमारतीतील कार्यालय पाच फूट पाण्यात तर जिल्हाधिकारी बसतात ती नवीन इमारत ३ फूट पाण्यात होती. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाचे कामकाज जिल्हा परिषदेतून सुरू होते.

चार दिवसांनी पुराचे पाणी ओेसरले, मात्र सर्वत्र गाळ आणि चिखल साचलेला होता. ही स्वच्छता करण्यातच चार पाच दिवस गेले, वरच्या मजल्यापर्यंत पाणी गेले नसले तरी विद्युत पुरवठा नसल्याने परिसरातील अन्य कार्यालये व विभागांचे कामकाजही ठप्प होते. अखेर तब्बल दहा दिवसांनंतर सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालय पूर्ववत सुरू झाले. अन्य विभागांचे कामकाज पुन्हा सुरू झाले.पाण्याखाली असलेल्या विभागातील कर्मचारी मात्र दप्तर लावण्यात गुंतले आहेत. येथील काही कागदपत्रे पाण्यात भिजली होती. ती वाळवली असली तरी पाण्यामुळे त्यांना बुरशी येण्याचे प्रकार सुरू झाले आहेत.

याबाबतची काळजी घेत कर्मचाऱ्यांना कागदपत्रे हाताळावी लागत आहेत. शिवाय फर्निचरचा ओलावा आहे. संगणकीय यंत्रणा, नेट कनेक्शन लावण्याचे काम सोमवारी सुरू होते. त्यामुळे या विभागातील प्रत्यक्ष कामकाज सुरू व्हायला आणखी किमान दोन दिवस लागण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Kolhapur Floodकोल्हापूर पूरcollectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर