जिल्हाधिकारी सूर्यवंशी रूजू
By Admin | Updated: April 9, 2015 00:59 IST2015-04-09T00:54:55+5:302015-04-09T00:59:15+5:30
गोंदियाचे नवीन जिल्हाधिकारी म्हणून विजय सूर्यवंशी बुधवारी रुजू झाले.

जिल्हाधिकारी सूर्यवंशी रूजू
कसबा बावडा : छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्यात सत्तारूढ गटाचे आमदार महादेवराव महाडिक यांच्या छत्रपती राजर्षी शाहू पॅनेल व माजी मंत्री सतेज पाटील यांच्या छत्रपती राजर्षी शाहू परिवर्तन पॅनेलमध्ये सामना रंगणार आहे. १९ जागांसाठी ३८ उमेदवार रिंंगणात राहिले असून, अटीतटीची दुरंगी लढत पाहावयास मिळणार आहे. मतदान १९ एप्रिलला होत असून, २० एप्रिलला मतमोजणी आहे.
‘राजाराम’साठी १७१ अर्ज दाखल झाले होते. बुधवारी अर्ज माघारीचा शेवटचा दिवस असल्याने माघारीसाठी झुंबड उडाली होती. १७१ अर्जांपैकी तब्बल १३३ जणांनी आपले अर्ज मागे घेतले. त्यामुळे १९ जागांसाठी ३८ जण रिंंगणात राहिले आहेत. दोन्ही पॅनेलमध्ये काही गटातील उमेदवार निश्चित करण्यात वेळ लागल्याने शेवटच्या दिवशी पॅनेल जाहीर झाले. महाडिक गटाकडून दुपारी १२ वाजता, तर सतेज पाटील गटातून दुपारी २ वाजता पॅनेल जाहीर झाले.
सत्तारूढ महाडिक गटाकडून तब्बल १२ नवीन चेहऱ्यांना पॅनेलमध्ये संधी देण्यात आली आहे. त्यात कारखान्याच्या माजी चार संचालकांचा समावेश आहे. उर्वरित सात विद्यमान संचालकांना पुन्हा संधी देऊन पॅनेलमध्ये समतोल साधण्याचा प्रयत्न केला आहे. कसबा बावडा गट क्र. ५ मध्ये हरीश चौगले व दिलीप उलपे या विद्यमान संचालकांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. सत्तारूढ पॅनेलने १२ नवीन चेहरे देऊन तगडे पॅनेल देण्याचा प्रयत्न केला आहे. तर सतेज पाटील यांनी सर्वसामान्य उमेदवारांना आपल्या पॅनेलमध्ये संधी दिली आहे.
आमदार महाडिक यांच्या राजर्षी शाहू पॅनेलचे उमेदवार
व्यक्ती उत्पादक सभासद गट क्र. १- वसंत बेनाडे (रुई), आनंदा तोडकर (पट्टणकोडोली).
गट क्र. २ - अमल महाडिक (वडगाव), सर्जेराव माने (भेंडवडे), सिद्धू नरबाळ (नरंदे).
गट क्र. ३ - यशवंत जाधव (शिये), प्रशांत तेलवेकर (वडणगे).
गट क्र. ४ - दिलीप पाटील (पुलाची शिरोली), पंडित पाटील (गडमुडशिंगी).
गट क्र. ५ - हरीश चौगले (कसबा बावडा), दिलीप उलपे (कसबा बावडा).
गट क्र. ६ - राजाराम मोरे (सोन्याची शिरोली), कुंडलिक चरापले (धामोड).
संस्था गट - महादेवराव महाडिक (पुलाची शिरोली).
अनुसूचित जाती जमाती- केशव कांबळे (चोकाक).
महिला सदस्य गट- कल्पना पाटील (वाशी), कल्पना किडगावकर (निगवे दुमाला).
इतर मागासवर्गीय - पांडुरंग पाटील (बाजारभोगाव).
भटक्या विमुक्त जाती जमाती- बिरदेव तानगे (कुंभोज).
सतेज पाटील यांच्या राजर्षी शाहू परिवर्तन पॅनेलचे उमेदवार :
व्यक्ती उत्पादक सभासद
गट क्र. १- बाबूराव बेनाडे (रुई), किरण भोसले (रुकडी).
गट क्र. २ - संभाजी पाटील (खोची), तानाजी चव्हाण (लाटवडे), शिवाजी किबिले (कुंभोज).
गट क्र. ३ - अजित पाटील (वडणगे), शिवाजी चौगले (शिये).
गट क्र. ४ - राजकुमार पाटील (शिरोली), महादेव पाटील (वाशी).
गट क्र. ५ - विश्वास नेजदार (कसबा बावडा), विद्यानंद जामदार (कसबा बावडा). गट क्र. ६ - महिपती खडके (धामोड), बापूसो पाटील (सावर्धन). संस्था गट - सखाराम चव्हाण (कांडगाव). अनुसूचित जाती जमाती - बाबासो देशमुख (पुलाची शिरोली). महिला प्रतिनिधी - मालिनी पाटील (भुये), रंजना पाटील (मुडशिंगी). इतर मागासवर्गीय - विजयकुमार चौगले (सांगवडे). भटक्या विमुक्त जाती-जमाती- आण्णा विठ्ठू रामण्णा (प. कोडोली).
थेट लढतीचे परिणाम
‘राजाराम’च्या निवडणुकीत १९ जागांसाठी बरोबर ३८ उमेदवार रिंगणात असल्याने ही लढत एकास एक होणार आहे. यामध्ये इतर उमेदवारांची भाऊगर्दी नसल्याने मतपत्रिका सुटसुटीत होणार आहे. दोन्ही पॅनेलची प्रत्येकी एक याप्रमाणे दोनच चिन्हे असल्याने मतदारांचाही मतदान करताना गोंधळ होणार नाही. तसेच मतमोजणीही जलद होण्यास हातभार लागणार आहे.