जिल्हाधिकारी ३ ऑक्टोबरपर्यंत व्यस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:25 IST2021-09-25T04:25:23+5:302021-09-25T04:25:23+5:30

कोल्हापूर : जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधून कोल्हापुरातील पर्यटन वाढविण्यासाठी साजरा करण्यात येणाऱ्या सप्ताहातील व्यस्त कार्यक्रमांमुळे जिल्हाधिकारी राहुल रेखावार ...

Collector busy till 3rd October | जिल्हाधिकारी ३ ऑक्टोबरपर्यंत व्यस्त

जिल्हाधिकारी ३ ऑक्टोबरपर्यंत व्यस्त

कोल्हापूर : जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधून कोल्हापुरातील पर्यटन वाढविण्यासाठी साजरा करण्यात येणाऱ्या सप्ताहातील व्यस्त कार्यक्रमांमुळे जिल्हाधिकारी राहुल रेखावार ३ ऑक्टोबरपर्यंत नागरिकांना भेटू शकणार नाहीत. त्यामुळे तातडीची बाब असल्यास अपर जिल्हाधिकारी किंवा निवासी उपजिल्हाधिकारी यांना भेटावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने शुक्रवारी केले.

सोमवारी (दि. २७) जागतिक पर्यटन दिन असून, याचे औचित्य साधून जिल्ह्यातील पर्यटन वाढावे, यासाठी गेल्या १५ दिवसांपासून पालकमंत्री सतेज पाटील व जिल्हाधिकारी रेखावार हे नियोजन करत आहेत. जिल्ह्यात पर्यटन वृद्धीच्या दृष्टीने बरीच जागतिक दर्जाची ठिकाणे आहेत. त्यांचे ब्रॅन्डिंग व्हावे व पुढील काळात अधिकाधिक पर्यटक जिल्ह्यात यावेत, यासाठी जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. त्यांना या क्षेत्रातील संस्था, संघटनांनी साथ दिली आहे. याअंतर्गत २६ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबरदरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांमध्ये जिल्हाधिकारी व्यस्त असल्यामुळे ते या कालावधीत नागरिकांना भेटू शकणार नाहीत.

---

Web Title: Collector busy till 3rd October