१९७० वाहनधारकांकडून साडेचार लाखांचा दंड वसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:24 IST2021-05-09T04:24:57+5:302021-05-09T04:24:57+5:30
कोल्हापूर : विनाकारण शहरात फिरणाऱ्या १९७० वाहनाधारकांसह मास्क न वापरणाऱ्या नागरिकांकडून पोलिसांनी शनिवारी दिवसभरात ४ लाख ६८ ...

१९७० वाहनधारकांकडून साडेचार लाखांचा दंड वसूल
कोल्हापूर : विनाकारण शहरात फिरणाऱ्या १९७० वाहनाधारकांसह मास्क न वापरणाऱ्या नागरिकांकडून पोलिसांनी शनिवारी दिवसभरात ४ लाख ६८ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल केला. याशिवाय २६३ वाहने जप्त केली.
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहेत. त्यात पोलीस प्रशासनाने तर २४ तास कंबर कसली आहे. शनिवारी दिवसभरात जिल्हाभरातील नाकाबंदीमधून पोलिसांनी विनाकारण फिरणाऱ्या १९७० वाहनधारकांकडून ३ लाख ९८ हजार, मास्क न वापरणाऱ्या ४५४ जणांकडून ७७ हजार ९०० असा एकूण ४ लाख ६८ हजारांचा दंड वसूल केला. मोटर वाहन कायद्याचा भंग करणाऱ्या २६३ जणांची वाहने जप्त केली.
चौकट
जुना राजवाडा पोलिसांनी १८८ प्रमाणे गुन्हे १२ दुकानदारांविरोधात निर्धारित वेळेनंतरही दुकाने उघडी ठेवल्याचा ठपका ठेवत गुन्हे दाखल केले आहेत. यात पंक्चर दुकान, वडापाव दुकान चालक, दुचाकी दुरुस्ती मेकॅनिक, फर्निचर दुकान, चायनीज खाद्यपदार्थ विक्रेता, बेकरी चालक आदींचा समावेश आहे.