शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

कोगनोळी तपासणी नाका असून अडचण नसून खोळंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 14:46 IST

CoronaVirus KarnatakaBorder - गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र सरकारनेही कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यात संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणाऱ्या प्रवासी वाहनांची संख्या रोडावली आहे. त्यामुळे महाराष्ट्र कर्नाटक आंतरराज्य सीमा असणाऱ्या कोगनोळी येथील कोरोना तपासणी पथक असून अडचण नसून खोळंबा अशी स्थिती निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देकोगनोळी तपासणी नाका असून अडचण नसून खोळंबा संचार बंदीमुळे प्रवासी वाहने रोडावल्याचे चित्र

बाबासो हळिज्वाळेकोगनोळी : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र सरकारनेही कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यात संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणाऱ्या प्रवासी वाहनांची संख्या रोडावली आहे. त्यामुळे महाराष्ट्र कर्नाटक आंतरराज्य सीमा असणाऱ्या कोगनोळी येथील कोरोना तपासणी पथक असून अडचण नसून खोळंबा अशी स्थिती निर्माण झाली आहे.कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्याची शक्यता लक्षात येताच फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापासूनच कर्नाटक शासनाने महाराष्ट्र-कर्नाटक आंतरराज्य सिमा असणाऱ्या कोगनोळी येथे पुन्हा एकदा तपासणी नाके सुरू केली. कर्नाटकात प्रवेश करणाऱ्या सर्वच वाहनांना कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्र सक्तीचे करण्यात आले.

महाराष्ट्र कर्नाटक आंतरराज्य सीमा असणाऱ्या कोगनोळी येथील तपासणी पथकाद्वारे महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणाऱ्या प्रवासी वाहनांची तपासणी केली जाते. वाहनातील प्रवाशांकडे कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्र नसेल तर त्यांना कर्नाटक राज्यात प्रवेश दिला जात नाही. यामध्ये मालवाहतूक करणारी वाहने, स्थानिक प्रवासी वाहतूक करणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस, दुचाकीस्वार यांना सवलत देण्यात आलेली आहे.

कर्नाटक राज्याव्यतिरिक्त इतर राज्यात जाणाऱ्या प्रवाशांनाही कर्नाटकात कुठेही न थांबण्याच्या अटीवर पुढील प्रवासास मान्यता दिली जाते. या तपासणी पथकामध्ये पोलीस कर्मचारी, वैद्यकीय अधिकारी व आशा कार्यकर्त्या यांच्याकडून कामकाज पाहिले जाते. हे कर्नाटकात प्रवेश करण्याचे मुख्य ठिकाण असल्याने या पथकास वारंवार अधिकाऱ्यांच्या भेटी होत असतात. बेळगावचे जिल्हाधिकारी हरीश कुमार, कोविड नियंत्रण विशेष पोलीस अधिकारी अतिरिक्त पोलिस महासंचालक भास्करराव यांनी भेट देऊन कामकाजाचा आढावा घेऊन येथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहनही दिले आहे.

शेजारच्या महाराष्ट्र राज्यात संचारबंदी लागू केल्यामुळे मोठ्या प्रमाणात कामगार वर्ग गावी परतण्याच्या तयारीत असू शकतो. त्यामुळे या तपासणी पथकामध्ये अतिरिक्त 25 स्थानिक होमगार्डची नियुक्ती करण्यात येणार आहे.-संतोष सत्यनाईक,मंडल पोलीस निरीक्षक

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याhighwayमहामार्गKarnatakकर्नाटकkolhapurकोल्हापूर