शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
5
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
6
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
7
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
8
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
9
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
10
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
11
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
12
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
13
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
14
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
15
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
16
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
17
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
18
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
19
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
20
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...

आचारसंहिता संपली; झेडपी गजबजली, अध्यक्षांनी घेतला आढावा, शिक्षकांची मोठी गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2019 11:14 IST

आचारसंहिता संपल्याने सोमवारी दिवसभर जिल्हा परिषद गजबजून गेली. अशातच बदल्यांप्रकरणी शिक्षक संघटना पदाधिकाऱ्यांनी शिक्षकांसमवेत हजेरी लावल्याने ही गर्दी आणखीनच वाढली. अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी वेगवेगळ्या विषयांचा दुपारी आढावा घेतला.

ठळक मुद्देआचारसंहिता संपली; झेडपी गजबजलीअध्यक्षांनी घेतला आढावा, शिक्षकांची मोठी गर्दी

कोल्हापूर : आचारसंहिता संपल्याने सोमवारी दिवसभर जिल्हा परिषद गजबजून गेली. अशातच बदल्यांप्रकरणी शिक्षक संघटना पदाधिकाऱ्यांनी शिक्षकांसमवेत हजेरी लावल्याने ही गर्दी आणखीनच वाढली. अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी वेगवेगळ्या विषयांचा दुपारी आढावा घेतला.लोकसभेची आचारसंहिता जाहीर झाल्यापासून जिल्हा परिषदेमध्ये येणाऱ्यांची गर्दी कमी झाली होती. एक तर अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने निवडणूक कामासाठी असल्याने आणि आचारसंहितेमुळे कोणतेच महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार नसल्याने पदाधिकारी, सदस्य, कार्यकर्ते इकडे गेल्या दोन महिन्यांत फिरकलेच नव्हते.दुपारी १२ नंतर अध्यक्षा महाडिक जिल्हा परिषदेत आल्या. त्यांनी सुरुवातीलाच टंचाई निर्माण झालेल्या गावांमध्ये झिंक टाक्या बसविण्याच्या कामाची माहिती घेतली. जी गावे टंचाई आराखड्यात आहेत तेथे जिल्हा परिषदेच्या निधीतून काम केले जाईल. मात्र, जी गावे आराखड्यात नाहीत परंतु तेथे खरोखरंच टंचाई आहे त्या गावांची यादी तयार करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. या गावांसाठी नियोजनमधून निधीबाबत प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.प्राथमिक शिक्षक बदल्यांच्या प्रक्रियेबाबत मोठ्या संख्येने तक्रारी घेऊन आले आहेत. त्यांच्याबाबत योग्य निर्णय घेण्याच्या सूचना त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांना दिल्या.

यावेळी पक्षप्रतोद विजय भोजे उपस्थित होते. दिवसभरामध्ये अर्थ आणि शिक्षण समितीचे सभापती अंबरिश घाटगे यांच्या अध्यक्षतेखाली दोन्ही समित्यांच्या सभा झाल्या. वंदना मगदूम यांच्या अध्यक्षतेखाली महिला व बालकल्याण विभागाचीही बैठक झाली. विशांत महापुरे यांच्या अध्यक्षतेखाली समाजकल्याण समितीची बैठक झाली. मंगळवारी सकाळी ११ वाजता जलव्यवस्थापन समितीची बैठक असून दुपारी १ वाजता स्थायी समितीची सभा होणार आहे. ४ जूनला सर्वसाधारण सभा असल्याने या ‘स्थायी’ला महत्त्व प्राप्त झाले आहे. पावसाळ्याच्या आधी अनेक प्रलंबित कामे मंजूर करण्यासाठी दिवसभर जिल्हा परिषदेचे सदस्य थांबून होते.निवड झालेल्या लाभार्थ्यांना प्राधान्यलोकसभा निवडणुकीच्या आधी ज्या लाभार्थ्यांची वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी निवड केली आहे. त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये या योजनांचा लाभ मिळाला पाहिजे, अशी भूमिका विविध समिती सदस्यांनी यावेळी आग्रहाने मांडली. त्यादृष्टीने जुन्या लाभार्थ्यांना प्राधान्याने लाभ देऊन नंतर नवीन आर्थिक वर्षासाठी लाभार्थी निवडण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.निधीचे पुनर्विलोकन होणारगेल्या आर्थिक वर्षातील विविध लाभांच्या योजनांचा निधी अखर्चित राहिला आहे. मुळात लाभार्थ्यांच्या याद्या उशिरा मंजूर करण्यात आल्या. तोपर्यंत आचारसंहिता जाहीर झाली. त्यामुळे या योजनेचा लाभ संबंधितांना देता आला नाही. हा सर्व निधी नवीन आर्थिक वर्षातील या योजनांसाठंी पुनर्विलोकित करण्याचा निर्णय अर्थसमितीच्या सोमवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला.विविध कार्यक्रम घेण्याच्या सूचनाएकीकडे लोकसभेची आचारसंहिता संपली असताना दुसरीकडे १५ आॅगस्टनंतर कधीही विधानसभेची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना वस्तू वाटप व अन्य जिल्हा परिषदेचे कार्यक्रम पावसाळा सुरू होण्याआधी घेण्याबाबत नियोजन करण्याच्या सूचना पदाधिकाऱ्यांनी आपल्या समितीच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.बदली प्रक्रियेबाबत तक्रारीप्राथमिक शिक्षकांच्या बदली प्रक्रियेबाबत काही त्रुटी असल्याने संघटना आणि पदाधिकारी, शिक्षकांनी शिक्षण सभापती अंबरिश घाटगे, विजय भोजे यांची भेट घेतली. त्यामुळे या दोघांच्याही दालनासमोर शिक्षकांची मोठी गर्दी दिवसभर दिसून येत होती.

महिला बालकल्याणच्या अधिकाऱ्यांची प्रतिक्षामहिला बालकल्याणच्या समितीसाठी तालुक्याचे अधिकारी अनुपस्थित असल्याने पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. या अधिकाऱ्यांचे प्रतिनिधीही उशिरा आल्याने बैठक अर्धा तास थांबवली. हे अधिकारी प्रशिक्षणामध्ये असल्याने तेथून त्यांना बोलावून घेण्यात आले. मात्र या प्रकाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. 

 

टॅग्स :zpजिल्हा परिषदkolhapurकोल्हापूर