आचारसंहिता संपली; झेडपी गजबजली, अध्यक्षांनी घेतला आढावा, शिक्षकांची मोठी गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2019 11:12 AM2019-05-28T11:12:15+5:302019-05-28T11:14:16+5:30

आचारसंहिता संपल्याने सोमवारी दिवसभर जिल्हा परिषद गजबजून गेली. अशातच बदल्यांप्रकरणी शिक्षक संघटना पदाधिकाऱ्यांनी शिक्षकांसमवेत हजेरी लावल्याने ही गर्दी आणखीनच वाढली. अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी वेगवेगळ्या विषयांचा दुपारी आढावा घेतला.

Code of Conduct ended; Zp gajabajali, reviewed by the president, large crowd of teachers | आचारसंहिता संपली; झेडपी गजबजली, अध्यक्षांनी घेतला आढावा, शिक्षकांची मोठी गर्दी

आचारसंहिता संपली; झेडपी गजबजली, अध्यक्षांनी घेतला आढावा, शिक्षकांची मोठी गर्दी

Next
ठळक मुद्देआचारसंहिता संपली; झेडपी गजबजलीअध्यक्षांनी घेतला आढावा, शिक्षकांची मोठी गर्दी

कोल्हापूर : आचारसंहिता संपल्याने सोमवारी दिवसभर जिल्हा परिषद गजबजून गेली. अशातच बदल्यांप्रकरणी शिक्षक संघटना पदाधिकाऱ्यांनी शिक्षकांसमवेत हजेरी लावल्याने ही गर्दी आणखीनच वाढली. अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी वेगवेगळ्या विषयांचा दुपारी आढावा घेतला.

लोकसभेची आचारसंहिता जाहीर झाल्यापासून जिल्हा परिषदेमध्ये येणाऱ्यांची गर्दी कमी झाली होती. एक तर अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने निवडणूक कामासाठी असल्याने आणि आचारसंहितेमुळे कोणतेच महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार नसल्याने पदाधिकारी, सदस्य, कार्यकर्ते इकडे गेल्या दोन महिन्यांत फिरकलेच नव्हते.

दुपारी १२ नंतर अध्यक्षा महाडिक जिल्हा परिषदेत आल्या. त्यांनी सुरुवातीलाच टंचाई निर्माण झालेल्या गावांमध्ये झिंक टाक्या बसविण्याच्या कामाची माहिती घेतली. जी गावे टंचाई आराखड्यात आहेत तेथे जिल्हा परिषदेच्या निधीतून काम केले जाईल. मात्र, जी गावे आराखड्यात नाहीत परंतु तेथे खरोखरंच टंचाई आहे त्या गावांची यादी तयार करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. या गावांसाठी नियोजनमधून निधीबाबत प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

प्राथमिक शिक्षक बदल्यांच्या प्रक्रियेबाबत मोठ्या संख्येने तक्रारी घेऊन आले आहेत. त्यांच्याबाबत योग्य निर्णय घेण्याच्या सूचना त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांना दिल्या.

यावेळी पक्षप्रतोद विजय भोजे उपस्थित होते. दिवसभरामध्ये अर्थ आणि शिक्षण समितीचे सभापती अंबरिश घाटगे यांच्या अध्यक्षतेखाली दोन्ही समित्यांच्या सभा झाल्या. वंदना मगदूम यांच्या अध्यक्षतेखाली महिला व बालकल्याण विभागाचीही बैठक झाली. विशांत महापुरे यांच्या अध्यक्षतेखाली समाजकल्याण समितीची बैठक झाली.

 मंगळवारी सकाळी ११ वाजता जलव्यवस्थापन समितीची बैठक असून दुपारी १ वाजता स्थायी समितीची सभा होणार आहे. ४ जूनला सर्वसाधारण सभा असल्याने या ‘स्थायी’ला महत्त्व प्राप्त झाले आहे. पावसाळ्याच्या आधी अनेक प्रलंबित कामे मंजूर करण्यासाठी दिवसभर जिल्हा परिषदेचे सदस्य थांबून होते.

निवड झालेल्या लाभार्थ्यांना प्राधान्य

लोकसभा निवडणुकीच्या आधी ज्या लाभार्थ्यांची वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी निवड केली आहे. त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये या योजनांचा लाभ मिळाला पाहिजे, अशी भूमिका विविध समिती सदस्यांनी यावेळी आग्रहाने मांडली. त्यादृष्टीने जुन्या लाभार्थ्यांना प्राधान्याने लाभ देऊन नंतर नवीन आर्थिक वर्षासाठी लाभार्थी निवडण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.

निधीचे पुनर्विलोकन होणार

गेल्या आर्थिक वर्षातील विविध लाभांच्या योजनांचा निधी अखर्चित राहिला आहे. मुळात लाभार्थ्यांच्या याद्या उशिरा मंजूर करण्यात आल्या. तोपर्यंत आचारसंहिता जाहीर झाली. त्यामुळे या योजनेचा लाभ संबंधितांना देता आला नाही. हा सर्व निधी नवीन आर्थिक वर्षातील या योजनांसाठंी पुनर्विलोकित करण्याचा निर्णय अर्थसमितीच्या सोमवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

विविध कार्यक्रम घेण्याच्या सूचना

एकीकडे लोकसभेची आचारसंहिता संपली असताना दुसरीकडे १५ आॅगस्टनंतर कधीही विधानसभेची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना वस्तू वाटप व अन्य जिल्हा परिषदेचे कार्यक्रम पावसाळा सुरू होण्याआधी घेण्याबाबत नियोजन करण्याच्या सूचना पदाधिकाऱ्यांनी आपल्या समितीच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

बदली प्रक्रियेबाबत तक्रारी

प्राथमिक शिक्षकांच्या बदली प्रक्रियेबाबत काही त्रुटी असल्याने संघटना आणि पदाधिकारी, शिक्षकांनी शिक्षण सभापती अंबरिश घाटगे, विजय भोजे यांची भेट घेतली. त्यामुळे या दोघांच्याही दालनासमोर शिक्षकांची मोठी गर्दी दिवसभर दिसून येत होती.

महिला बालकल्याणच्या अधिकाऱ्यांची प्रतिक्षा

महिला बालकल्याणच्या समितीसाठी तालुक्याचे अधिकारी अनुपस्थित असल्याने पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. या अधिकाऱ्यांचे प्रतिनिधीही उशिरा आल्याने बैठक अर्धा तास थांबवली. हे अधिकारी प्रशिक्षणामध्ये असल्याने तेथून त्यांना बोलावून घेण्यात आले. मात्र या प्रकाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.
 

 

Web Title: Code of Conduct ended; Zp gajabajali, reviewed by the president, large crowd of teachers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.