कोल्हापूर जिल्ह्यातील आठ शेतकऱ्यांचा समावेश
By Admin | Updated: August 15, 2014 01:03 IST2014-08-15T01:02:56+5:302014-08-15T01:03:51+5:30
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते विविध पुरस्कारांनी सन्मानित

कोल्हापूर जिल्ह्यातील आठ शेतकऱ्यांचा समावेश
कोल्हापूर - कृषी क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या राज्यातील शेतकऱ्यांना गुरुवारी नाशिक येथे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमात तळसंदे (ता. हातकणंगले) येथील संजय डी. पाटील यांनी वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार स्वीकारला. यावेळी नितीन राऊत, राधाकृष्ण विखे-पाटील, छगन भुजबळ, आदी उपस्थित होते.
कोल्हापूर जिल्ह्यातील संजय डी. पाटील (तळसंदे, ता. हातकणंगले) यांना वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार, मारुती गणपती पाटील यांना खरीप भात गटात तृतीय क्रमांकाचा पुरस्कार, भरत जयसिंग पाटील (दोघे अर्जुनवाडा, ता. राधानगरी) यांना खरीप भात गटात द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार, नागेश कृष्णा बामणे (सरोळी, ता. गडहिंग्लज) यांना वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार, प्रमोद कल्लाप्पा चौगुले गडमुडशिंगी (ता. करवीर) यांना वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार, राजकुमार बापू आडमुठे यांना उद्यान पंडित पुरस्कार, वैजयंती विद्याधर वझे (दोघेही तमदलगे, ता. शिरोळ) यांना जिजामाता कृषिभूषण पुरस्कार, मीनाक्षी मदन चौघुले (तारदाळ, ता. हातकणंगले) यांना जिजामाता कृषिभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.