शहरं
Join us  
Trending Stories
1
'शक्तिपीठ'च्या मार्गात बदल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अनेक घोषणा म्हणाले, अब आगे बढ़ चुका हूँ मैं... 
2
फुटबॉलचा किंग अन् क्रिकेटचा देव एकाच व्यासपीठावर! वानखेडेवर '१०'ची जादू
3
ऑस्ट्रेलियात दहशतवादी हल्ला, १२ पर्यटक ठार, २९ जखमी; सिडनीतील बाँडी बीचवर बेछूट गोळीबार 
4
कोट्यवधी रुपयांची अफरातफर; भ्रष्टाचार केला म्हणून चीनच्या बँकरला मृत्युदंड
5
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष; सरकार आणि संघटनात्मक अनुभवाची दखल
6
बाइक टॅक्सीचालकाचा तरुणीवर अतिप्रसंग; धैर्याने प्रतिकार करीत गाठले पोलिस ठाणे
7
संपादकीय : महायुतीचा नवा बूस्टर..! नागपूर अधिवेशनात चर्चा, मुनगंटीवारांची सभागृहात तुफान टोलेबाजी
8
नवी मुंबई विमानतळामुळे मुंबईत सकाळच्या वेळी येता येईल का? संध्याकाळी परत जाता येईल का?
9
नवी मुंबई विमानतळावर तिसरीही धावपट्टी! दीर्घकालीन हवाई वाहतुकीचा आढावा; सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया सुरू
10
गोवा अग्निकांड; अपघात नव्हे, अक्षम्य बेपर्वाई! २५ जणांच्या मृत्यूनंतर मालकांचे थायलंडमध्ये पलायन
11
विमा क्षेत्रात १०० टक्के एफडीआय- सर्वांसाठीच बाधक! कोट्यवधी विमाधारकांची गुंतवणूक धोक्यात
12
IND vs SA 3rd T20I : टीम इंडियानं मॅच जिंकत दक्षिण आफ्रिकेला टाकले मागे; पण सूर्या-गिल पुन्हा फेल!
13
अपहरणाचा कट नगर पोलिसांनी उधळला! पुण्याच्या दिशेने जाताना नागापूर पुलावर थरार, दोघांना अटक
14
"मोदी, शाह, राजनाथ, नड्डा...!" भाजपचे कार्यकारी अध्यक्ष होताच काय म्हणाले नितीन नवीन?
15
‘लोकमत महागेम्स’मुळे पुन्हा मैदानावर दिसली क्रीडासंस्कृती: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
'मिसेस मुख्यमंत्री' GOAT मेस्सीला भेटल्या, खास PHOTO पोस्ट करून अमृता फडणवीसांनी लिहिले...
17
पंतप्रधान मोदी, रशियाचे पुतिन यांच्या खास मैफलीत झंकारली नागपूरकर लावण्य अंबादे यांची सतार
18
मीरा भाईंदर महापालिका, परिवहन ठेकेदाराच्या वादात बससेवा डबघाईला; सामान्य नागरिकांना मनस्ताप
19
महिनाभर आधी झालेलं प्रेयसीचं लग्न, पहिल्या प्रियकराने नवऱ्याला भेटायला बोलवलं अन् संपवलं...
20
VIDEO: आधी गणपती बाप्पाचा जयजयकार, नंतर CM देवेंद्र फडणवीसांनी मेस्सीला केलं एक 'प्रॉमिस'
Daily Top 2Weekly Top 5

सहकाराच्या जिल्ह्यात गटशेतीही बहरतेय-सात प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 23:47 IST

बहुतांश शेती तुकड्या-तुकड्यांत विभागलेल्या कोल्हापूर जिल्ह्यात गटशेती बाळसे धरू लागली असून, कृषी विभागाच्या प्रोत्साहनामुळे ती बहरत आहे. परवडणारी शेती करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून सुरू झालेल्या उपक्रमात आतापर्यंत नोंदणी केलेल्या १४५० पैकी १३ गटांनी प्रकल्प आराखडे सादर केले आहेत.

ठळक मुद्दे१४५० गटांची नोंदणी : सहा गटांना ९० लाखांचे अनुदान मिळाले;

नसिम सनदी ।कोल्हापूर : बहुतांश शेती तुकड्या-तुकड्यांत विभागलेल्या कोल्हापूर जिल्ह्यात गटशेती बाळसे धरू लागली असून, कृषी विभागाच्या प्रोत्साहनामुळे ती बहरत आहे. परवडणारी शेती करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून सुरू झालेल्या उपक्रमात आतापर्यंत नोंदणी केलेल्या १४५० पैकी १३ गटांनी प्रकल्प आराखडे सादर केले आहेत. यांतील मागील वर्षातील सहा गटांना पहिल्या टप्प्यातील प्रत्येकी १५ लाख असे ९० लाखांचे अनुदानही कृषी विभागाने दिले आहे. कोल्हापूरची ओळख सहकारी संस्थांचा जिल्हा अशी आहे. त्याचाच वेगळा आविष्कार गटशेतीतून फुलत आहे.

शेतीच्या तुकडीकरणामुळे आधुनिक शेती करण्यावर मर्यादा येते. याची जाणीव असलेल्या शेतकऱ्यांनी एकत्रितपणे गटशेतीसाठी प्रस्ताव दिले आहेत. यापैकी २०१७-१८ या वर्षात सहा गटांचे प्रस्ताव मंजूर होऊन त्यांना पहिल्या टप्प्यातील अनुदानही वाटले आहे. २०१८-१९ या चालू वर्षासाठी जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाकडून सात प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी शासनाकडे वर्ग केलेत.

गटांना तीन टप्प्यांत अनुदान मिळणार असून, पहिल्या टप्प्यात गटाचे संघटन आणि प्रशिक्षणावर भर आहे. त्यासाठी कमाल २५ लाख रुपयांचे अनुदान आहे. तथापि, आता १५ लाखच देण्यात आले आहेत. दुसºया टप्प्यात प्रकल्पाचे प्रत्यक्ष बांधकाम, यंत्रणा बसविणे, तर तिसºया अंतिम टप्प्यात उत्पादन सुरू करून ब्रॅँडिंग, मार्केटिंग, पॅकिंग यावर भर असणार आहे. दुसºया व तिसºया टप्प्यातील अनुदान गटाने निवडलेल्या राष्ट्रीयीकृत बँकेच्या खात्यावरच कृषी विभागाकडून भरले जाणार आहे. या कालावधीत बँकेने कर्जाच्या स्वरूपात गटाला रक्कम द्यावयाची आहे. ही रक्कम साधारणपणे दरवर्षी सहा कोटी रुपये इतकी आहे, अशी माहिती जिल्हा कृषी अधीक्षक ज्ञानदेव वाकुरे यांनी दिली.२०१८-१९ या वर्षासाठी मंजूर झालेले प्रस्तावश्रीमान योगी तुकाराम महाराज शेतकरी सहकारी सेवा संस्था, कासारपुतळे : भात प्रक्रियाचाळोबा महिला स्वयंम साहाय्यता गट, सातेवाडी, आजराव्हर्मीफार्मा व ट्रॅडिशनलजागर उत्पादक कंपनी :गूळ उत्पादनशिवा रामा पाटील संस्था, कारभारवाडी, ता. करवीर : गूळ उत्पादन व सामूहिक सिंचननागनाथ महिलास्वयंसाहाय्यता शेतकरी गट, लाटगाव, ता. आजरा : सेंद्रिय खतनिर्मितीराटे कृषी उत्पादक व उद्योग समूह खडुळे, ता. गगनबावडा : बांबू मूल्यवर्धनदूधगंगा अ‍ॅग्रो प्रोड्यूसरकंपनी, कसबा वाळवे, ता. राधानगरी : भाजीपाला पशुधन व्यवस्थापन.जिल्ह्यातील या गटांना मिळाले अनुदानशासनाकडून अनुदानप्राप्त गट प्रकल्प रक्कमग्रीन रिव्हॅल्युएशन अ‍ॅग्रो सोल्युशन २ कोटी ३० लाख ४ हजारकंपनी, केखले (ता. पन्हाळा)आनंदराव दादा अ‍ॅग्रो प्रोड्युसर कंपनी, कागल २ कोटी २३ लाख ७९ हजारअन्नदाता नैसर्गिक शेतीमाल २ कोटी ९५ लाख ८३ हजार उत्पादक मंडळ, हातकणंगलेमहाबीमा बांबू प्रोड्यूसर कंपनी, हातकणंगले २ कोटी ९ लाख ६७ हजारमहाराष्ट्र कृषी विज्ञान मंडळ, २ कोटी २७ लाख २५ हजार कवळीकट्टी, गडहिंग्लजशिवमुद्रा शेतकरी गट मांडेदुर्ग, चंदगड कोटी ९७ लाख ८ हजार

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFarmerशेतकरी