सहकारातील कामकाज गतिमान

By Admin | Updated: September 6, 2015 23:24 IST2015-09-06T23:24:32+5:302015-09-06T23:24:32+5:30

चंद्रकांतदादा पाटील : पोस्टल कर्मचारी पतसंस्थेचा कार्यक्रम

Co-operative activities | सहकारातील कामकाज गतिमान

सहकारातील कामकाज गतिमान

कोल्हापूर : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पहाटे तीनपर्यंत बसून फायलींचा निपटारा करीत असतात. माझ्या खात्याचा कारभारही असाच सुरू आहे. त्यामुळे सहकारातील कामकाजही गतिमान केले आहे, असे प्रतिपादन सहकार व पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. जिल्हा पोस्टल कर्मचारी सहकारी पतसंस्थेतर्फे रविवारी आयोजित शैक्षणिक बक्षीस वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. डाक विभागाचे प्रवर अधीक्षक रमेश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. शाहू स्मारक भवनमध्ये हा कार्यक्रम झाला. मंत्री पाटील म्हणाले, प्रत्येक घटकाने आपल्या समूहाची काळजी घेतल्यास समाजाचा विकास लवकर होईल. पोस्टल कर्मचारी यांनी स्थापन केलेल्या पतसंस्थेची कामगिरी चांगली आहे. अन्य संस्था अडचणीत असताना उत्कृष्ट कामगिरीमुळे पोस्टल कर्मचाऱ्यांची पतसंस्था १४ टक्के लाभांश देते, हे कौतुकास्पद आहे. पोस्टल कर्मचाऱ्यांनी आपल्या मुलांसाठी स्वतंत्र अकॅडमी सुरू करावी. त्याला पूर्णपणे सहकार्य राहील. अकॅडमीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आवश्यक शिक्षण देण्याचा प्रयत्न करावा. यावेळी सभासदांच्या गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले. अधीक्षक पाटील यांनी पतसंस्थेच्या कामगिरीचा आढावा घेतला. सुरेश मगदूम यांनी स्वागत केले. भाग्यश्री चरणकर यांनी सूत्रसंचालन केले. हास्यसम्राट प्रा. राहुल कुलकर्णी यांचा ‘हसवेगिरी’ हा एकपात्री प्रयोग सादर झाला. उपाध्यक्ष आर. ए. संकपाळ, एन. जे. हंजे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.

‘इनकॅश’ करावे लागते...
चंद्रकांतदादा यांनी, ‘भाजपचे जिल्हाध्यक्ष महेश जाधव यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. त्यामुळे ‘पोस्टल’च्या कार्यक्रमाला उशीर झाला. पालिका निवडणूक तोंडावर असल्यामुळे सगळ्यांना ‘इनकॅश’ करावे लागत आहे,’ असे सांगताच हशा पिकला.

एकेरी उल्लेख, दिलगिरी
भाषणात बोलण्याच्या ओघात मंत्री चंद्रकांतदादा यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचा उल्लेख एकेरी केला. मात्र, ते लक्षात आल्यानंतर त्वरित दिलगिरीही व्यक्त केली.

Web Title: Co-operative activities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.