लघुउद्योजक, विद्यार्थ्यांसाठी ‘सीएमएम मशिन’ ठरणार उपयुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:27 AM2021-09-18T04:27:24+5:302021-09-18T04:27:24+5:30

कोल्हापूर : येथील केआयटी अभियांत्रिकी महाविद्यालयातील मेट्रोलॉजी लॅबच्या आधुनिकीकरणासाठीच्या प्रस्तावाला मंजुरीसह ११ लाख ५७ हजार रुपयांचा निधी अखिल ...

The CMM machine will be useful for small entrepreneurs and students | लघुउद्योजक, विद्यार्थ्यांसाठी ‘सीएमएम मशिन’ ठरणार उपयुक्त

लघुउद्योजक, विद्यार्थ्यांसाठी ‘सीएमएम मशिन’ ठरणार उपयुक्त

Next

कोल्हापूर : येथील केआयटी अभियांत्रिकी महाविद्यालयातील मेट्रोलॉजी लॅबच्या आधुनिकीकरणासाठीच्या प्रस्तावाला मंजुरीसह ११ लाख ५७ हजार रुपयांचा निधी अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) दिले आहेत. त्यामध्ये केआयटीने पाच लाखांची भर घालून अत्याधुनिक पद्धतीचे कोऑर्डिनेट मेजरिंग मशिन (सीएएम) या लॅबमध्ये उपलब्ध करून दिले आहे.

या मशीनचे उद्घाटन बुधवारी महाविद्यालयाचे अध्यक्ष सुनील कुलकर्णी, उपाध्यक्ष साजिद हुदली, सचिव दीपक चौगुले, विश्वस्त भरत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. एआयसीटीईला प्रस्ताव पाठविण्यासाठी परिश्रम केलेल्या डॉ. गिरीश नाईक, प्रा. अजय मधाळे यांचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांचे प्रात्यक्षिक कौशल्य वाढविण्यासाठी, तर लघुउद्योजकांना या सीएमएम मशिनचा व्यावसायिक फायदा होणार असल्याचे अध्यक्ष कुलकर्णी यांनी सांगितले. कोल्हापुरातील उद्योगक्षेत्राला सीएमएम विषयातील कौशल्ययुक्त मनुष्यबळ पुरवण्यासाठी भविष्यात केआयटी महाविद्यालय आणि इलेक्ट्रॉनिक कंपनीतर्फे सर्टिफिकेट कोर्स (प्रमाणपत्र अभ्यासक्रम) तयार केला जाणार आहे. केआयटीच्या शैक्षणिक स्वायत्ततेमुळे तत्काळ विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात सीएमएम या विषयाच्या प्रात्यक्षिकाचा अंतर्भाव केला असल्याचे मेकॅनिकल विभागप्रमुख डॉ. उदय भापकर यांनी सांगितले.

फोटो (१७०९२०२१-कोल-केआयटी कॉलेज) : कोल्हापुरात बुधवारी केआयटी अभियांत्रिकी महाविद्यालयातील मेट्रोलॉजी लॅबमधील सीएमएम मशिनचे उद्घाटन महाविद्यालयाचे अध्यक्ष सुनील कुलकर्णी, उपाध्यक्ष साजिद हुदली, सचिव दीपक चौगुले, विश्वस्त भरत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

Web Title: The CMM machine will be useful for small entrepreneurs and students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app