अडले-नडलेले सावकारांच्या फासाला

By Admin | Updated: March 22, 2016 01:05 IST2016-03-22T01:04:32+5:302016-03-22T01:05:06+5:30

अनधिकृत सावकारांचा सुळसुळाट : सरकारी व्याजदर खासगी सावकारांकडून धाब्यावर; महिन्याला २० ते ३० टक्के व्याज आकारणी

The clutches of staggered lenders | अडले-नडलेले सावकारांच्या फासाला

अडले-नडलेले सावकारांच्या फासाला

राजाराम लोंढे --कोल्हापूर सरकारच्या धोरणांनुसार शेतीव्यतिरिक्त दिलेल्या तारण कर्जास १५ टक्के, तर विनातारण कर्जास प्रतिवर्षी १८ टक्के व्याज आकारणी करणे बंधनकारक आहे. परंतु, खासगी सावकारांकडून सरकारचे धोरणच धाब्यावर बसवत महिन्याला २० ते ३० टक्के दराने व्याजाची आकारणी सुरू आहे.
नडलेल्या व्यक्तींच्या गळ्याभोवतीचा खासगी सावकारांचा फास दिवसेंदिवस आवळत चालला असून, बक्कळ पैसा मिळत
असल्याने खेडोपाडी अनधिकृत सावकारांच्या वाढलेल्या सुळसुळाटाला लगाम लावण्याचे आव्हान पोलिसांसह निबंधक कार्यालयासमोर आहे.
गेले महिन्याभरात दोन-तीन खासगी सावकारांच्या प्रकरणांनी जिल्हा हादरून गेला आहे. अमोल पवार याचे प्रकरण वेगळे असले तरी त्याचे मूळ एकच आहे. विविध कारणांनी संकटात आलेले व बँका-पतसंस्थांमध्ये पत नसलेल्या व्यक्ती सावकाराच्या जाळ्यात अडकतात. काहीजण चैनीसाठी कर्जे काढत असले तरी बहुतांशी कर्जे ही नाडलेल्या व्यक्तीच काढतात.
शहराबरोबर ग्रामीण भागात खासगी सावकाराचे लोण जोरात असून त्यामध्ये अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झालेली आहेत. शेतकरी, मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या व्यक्तीच यामध्ये अडकल्या जातात.
मुळात सरकारी दर किती आहे, हेच बहुतांशी जणांना माहिती नसल्याने ‘सावकार सांगेल तो व्याजदर’ असा पायंडाच काहीसा या व्यवसायात पडला आहे. सावकारांकडून कर्ज घेताना संपूर्ण मुद्दलही कर्जदाराच्या हातात पडत नाही. कर्जाची मुद्दल देतानाच त्यातून पहिल्या महिन्याचे होणारे व्याज कापून घेतले जाते. त्यामुळे कर्जाची सुरुवातच व्याजावर व्याज आकारणीने होते.
महिन्याला व्याज वसूल करण्यासाठी सावकारांची स्वतंत्र यंत्रणा कार्यरत आहे. एखाद्या महिन्यात व्याज देणे जमले नाही तर सुलतानी पद्धतीने वसुलीही केली जाते.


रेकॉर्डमध्येही भूलभुलैया!
सहायक निबंधक कार्यालयाकडे नोंदणीकृत सावकार वार्षिक रेकॉर्ड सरळ व्याजाच्या आकारणीचे सादर करतात. मात्र, प्रत्यक्षात चक्रवाढ व्याजाने मनमानी व्याज आकारणी करून कर्जदाराला कंगाल करण्याची प्रवृत्ती या क्षेत्रात वाढली आहे.
तक्रार आली तरच कारवाई
जिल्ह्यात राजरोसपणे बेकायदेशीर सावकारकी सुरू असताना शासकीय यंत्रणा मात्र सुस्त आहे. निबंधक कार्यालयाला तक्रारी आली तरच कारवाईचा प्रयत्न केला जात असल्याने सावकार मोकाट सुटले आहेत. जीवनाच्या सगळ्या दोऱ्या ज्याच्या हाती आहेत, त्या सावकाराच्या विरोधात तक्रार करण्याची कोणीही कर्जदार धाडस करणार नाही तरीही सरकारी यंत्रणा मात्र त्याच्या तक्रारीची वाट बघते.


‘एलसीबी’च्या रडारवर
जिल्ह्यात सध्या गाजत असलेल्या खासगी सावकाराच्या प्रकरणाने पोलिसांसह सहकार निबंधक कार्यालयातील यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. नोंदणीकृत सावकार किती, याबाबतची माहिती गोळा करण्याचे काम ‘एलसीबी’ (स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा)कडून सुरू असल्याचे समजते.
या दराने व्याज आकारणे बंधनकारक :
४शेतकऱ्यांसाठी तारण कर्ज -
९ टक्के (प्रतिवर्षी)
४विनातारण कर्ज -
१२ टक्के
४शेतकऱ्यांशिवाय इतर व्यक्तींचे
कर्ज - १५ टक्के (प्रतिवर्षी)
४विनातारण कर्ज - १८ टक्के


तालुकानिहाय सावकार असे :
तालुकासावकार संख्यानव्याने
(मार्च २०१५)मागणी
कोल्हापूर शहर१४२६
हातकणंगले ५५८
करवीर १५४
आजरा १-
चंदगड ३-
गडहिंग्लज८१
राधानगरी१-
भुदरगड १-
कागल ३१
शिरोळ५ -
पन्हाळा ६-
गगनबावडा- -
शाहूवाडी--
एकूण२४०२०

Web Title: The clutches of staggered lenders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.