शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरात दिवसभर ढगाळ वातावरण, पावसाची भुरभुर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2020 16:30 IST

कोल्हापूर जिल्ह्यात रविवारी दिवसभर आकाश दाटून आले होते, अधूनमधून पावसाची भुरभुर राहिली. ढगाळ वातावरणामुळे हवेत गारठा जाणवत होता.

ठळक मुद्देकोल्हापूरात दिवसभर ढगाळ वातावरण अधूनमधून पावसाची भुरभुर

कोल्हापूर : जिल्ह्यात रविवारी दिवसभर आकाश दाटून आले होते, अधूनमधून पावसाची भुरभुर राहिली. ढगाळ वातावरणामुळे हवेत गारठा जाणवत होता.गेली आठ दिवस कोल्हापूर जिल्ह्यात पाऊस रोज जोरदार हजेरी लावत आहे. शनिवारीही दुपारी कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी धुवांदार पाऊस कोसळल. रविवारी रात्रभर जिल्ह्यात पावसाची भुरभुर होती. सकाळ पासून ढगाळ वातावरणासह अनेक तालुक्यात रिपरिप सुरू होती.

दहा नंतर आकाश दाटून आल्याने जोरदार पाऊस कोसळणार असेच वाटत होते. मात्र दिवसभर तसेच वातावरण कायम राहिले. कोल्हापूर शहरात ढगाळ वातावरणासह अधूनमधून पावसाची भुरभुर सुरू होती. पाऊस झाला नसला तरी हवेत गारठा मात्र जाणवत होता.रविवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासात जिल्ह्यात सरासरी ७.६७ मिली मीटर पावसाची नोंद झाली. सर्वाधिक पाऊस गगनबावडा तालुक्यात २०.५८ मिली मीटर झाला. धरणक्षेत्रात कमी अधिक प्रमाणात पाऊस झाल्याने विसर्ग कायम आहे.तालुकानिहाय पाऊस मिली मीटरमध्ये असा  हातकणंगले २.२५, शिरोळ ३, पन्हाळा १३.७१, शाहूवाडी १०.५०, राधानगरी ६, गगनबावडा २०.५८, करवीर ५.९१. कागल ३, गडहिंग्लज २.५७, भुदरगड २.८०, आजरा ९.७५, चंदगड १२.दरम्यान, गगनबावडा ते भूईबावडा मार्गावर दरड कोसळल्याने एस. टी. वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्याचबरोबर पन्हाळा ते केर्ली जोतिबा रस्ता खचल्याने या मार्गावरील वाहतूक गायमुख मार्गे सुरू असल्याची माहीती जिल्हा प्रशासनाने दिली.आठवडाभर पाऊस राहणारजिल्ह्यात आगामी आठ दिवस पाऊस राहण्याचा अंंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. यामध्ये आज, सोमवार पासून मेघगर्जनेसह जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे.आगामी चार दिवस असे राहील हवामान-वार         तापमान डिग्री     हवामान

  • सोमवार    २२ ते २६          मेघगर्जनेसह पाऊस
  • मंगळवार   २१ ते २६          मेघगर्जनेसह पाऊस
  • बुधवार       २२ ते २८         मेघगर्जनेसह पाऊस
  • गुरूवार        २२ ते २८        पाऊस

 

टॅग्स :Rainपाऊसkolhapurकोल्हापूर