शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

मेघप्रणव पोवारच्या लघुपटाची ‘इफ्फी’मध्ये निवड, कोल्हापूरच्या कलावंतांची हॅट्ट्रिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2018 11:59 IST

गोव्यात २० नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या ४९ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी यंदा दोन मराठी चित्रपटांची आणि सर्वाधिक आठ मराठी लघुचित्रपटांची निवड करण्यात झालेली आहे. यात कोल्हापूरच्या मेघप्रणव पोवार याच्या लघुपटाचा समावेश आहे. ‘इफ्फी’त निवड होण्याचे हे सलग तिसरे वर्ष असल्यामुळे कोल्हापूरच्या कलावंतांनी हॅट्ट्रिक साधली आहे.

ठळक मुद्देमेघप्रवण पोवारच्या लघुपटाची ‘इफ्फी’मध्ये निवड, कोल्हापूरच्या कलावंतांची हॅट्ट्रिकसलग तिसरे वर्ष : गोव्याच्या महोत्सवात यंदा दोन मराठी चित्रपट तर सर्वाधिक आठ लघुपटांची निवड

संदीप आडनाईककोल्हापूर : गोव्यात २० नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या ४९ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी यंदा दोन मराठी चित्रपटांची आणि सर्वाधिक आठ मराठी लघुचित्रपटांची निवड करण्यात झालेली आहे. यात कोल्हापूरच्या मेघप्रणव पोवार याच्या लघुपटाचा समावेश आहे. ‘इफ्फी’त निवड होण्याचे हे सलग तिसरे वर्ष असल्यामुळे कोल्हापूरच्या कलावंतांनी हॅट्ट्रिक साधली आहे.

या महोत्सवात विविध भाषांतील एकूण २२ चित्रपट आणि २१ लघुपट इंडियन पॅनारोमा या विभागात दाखविण्यात येणार आहेत. यामध्ये पुण्याच्या निपुण अविनाश धर्माधिकारी दिग्दर्शित ‘धप्पा’ आणि प्रतिमा जोशी दिग्दर्शित आम्ही दोघी हे दोन पूर्ण लांबीचे मराठी चित्रपट दाखविण्यात येणार आहेत. यंदा प्रथमच मराठीतील सर्वाधिक आठ लघुपट येथे दाखविण्यात येत आहेत.

मेघप्रणव पोवार कोल्हापूरचामेघप्रणव बाबासाहेब पोवार हा कोल्हापूरचा कलावंत. पुण्याच्या एफटीटीआयआयमधून  दिग्दर्शन अभ्यासक्रम त्याने पूर्ण केला आहे. गेल्या वर्षी एफटीटीआयआय निर्मित ‘हॅपी बर्थ डे’ या लघुपटाला उत्कृष्ट कौंटुंबिक मूल्यांसाठीचा भारत सरकारचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. याच लघुपटाची यंदाच्या प्रतिष्ठेच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी निवड झाली आहे. २६ नोव्हेंबर रोजी गोव्यात हा लघुपट दाखविण्यात येणार आहे.सलग तिसऱ्या वर्षी कोल्हापूरची हॅट्ट्रिकगोव्याच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आपला चित्रपट प्रदर्शित व्हावा, ही अनेक कलावंतांची इच्छा असते. त्यामुळे २०१६ मध्ये उमेश बगाडे याचा ‘चौकट,’ २०१७ मध्ये अजय कुरणे याचा ‘बलुतं’ आणि आता यावर्षी मेघप्रणव पोवार याचा ‘हॅपी बर्थ डे’ या लघुपटाचे प्रदर्शन या महोत्सवात होत असल्यामुळे कोल्हापूरच्या कलावंतांच्या कलाकृतीचे हे सलग तिसरे वर्ष आहे. यामुळे चित्रपट क्षेत्रातील युवा कलावंतांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.कलावंतांची आंतरराष्ट्रीय भरारीकोल्हापूरच्या मयूर कुलकर्णी याचा ‘भवताल’ हा लघुपट याच महोत्सवात सर्वप्रथम दाखविण्यात आला होता. याशिवाय २०१६ मध्ये त्याला ‘इफ्फी’चा भाग असलेल्या ‘फिल्म बाजार’मध्ये पटकथेसाठीही शिष्यवृत्ती मिळाली होती. २०१७ मध्ये करण चव्हाण आणि विक्रम पाटील यांच्या ‘इमेगो’ या पूर्ण लांबीच्या चित्रपटाचाही फिल्म बाजारमध्ये समावेश होता. यंदा हा चित्रपट मुंबईच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातही दाखविण्यात आला.

 

टॅग्स :IFFIइफ्फीkolhapurकोल्हापूर